Video - तुफान राडा! मुलीला मेसेज केल्याने आपापसात भिडली मुलं; लाथा-बुक्क्यांनी मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 18:54 IST2024-02-13T18:47:09+5:302024-02-13T18:54:26+5:30

Video - मुलांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. भर रस्त्यात राडा झाला.

viral video boys fought kicking punching slapping each other for texting girl | Video - तुफान राडा! मुलीला मेसेज केल्याने आपापसात भिडली मुलं; लाथा-बुक्क्यांनी मारहाण

Video - तुफान राडा! मुलीला मेसेज केल्याने आपापसात भिडली मुलं; लाथा-बुक्क्यांनी मारहाण

चुकून दुसऱ्याला मेसेज पाठवणे सर्रास घडते. कदाचित हे आपल्या सर्वांच्या बाबतीत देखील कधीतरी घडलं असावं. सहसा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, आजकाल असं केल्याने त्रासदायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये काही मुलांसोबत अशीच एक घटना घडली. एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला मुलांच्या ग्रुपमध्ये हिंसक मारामारी होताना दिसत आहे. मुलांनी एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. भर रस्त्यात राडा झाला. व्हिडीओ अपलोड करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, चुकून मेसेज केल्याने ही मारामारी सुरू झाली आहे. एका मुलीला मेसेज केल्याने मुलं आपापसात भिडल्याचं म्हटलं आहे. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ पाहून लोक घाबरले आणि सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा झाली. व्हिडीओ पाहिल्यानंतर काही लोकांनी मुलांच्या वागणुकीवर टीका केली, तर काहींनी समाजातील छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणाऱ्या हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. या घटनेवरून सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. 

Web Title: viral video boys fought kicking punching slapping each other for texting girl