गेल्या काही दिवसांपासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यात लष्करी संघर्ष भडकला आहे. अमेरिकेसह इतर देशांनी प्रयत्न करूनही हा संघर्ष थांबलेला नाही. सीमेवरून सुरू असलेल्या या संघर्षात आता भगवान विष्णूची मूर्तीही तोडण्यात आली आहे. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळापासून सुरू असलेल्या या संघर्षामध्ये थायलंडच्या लष्कराने ही मूर्ती पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
एएफपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, एका कंबोडियन अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की, ही मूर्ती थायलंडच्या लष्कराकडून पाडण्यात आली आहे. सीमा रेषेनजीक असलेल्या विहियर प्रांताचे सरकारी प्रवक्ते किम चानपन्हा यांनी सांगितले की, ही भव्य मूर्ती कंबोडियाच्या हद्दीत होती.२०१४ मध्ये तयार करण्यात आलेली ही भगवान विष्णूची मूर्ती सोमवारी पाडण्यात आली.
सीमेरेषेपासून दूर असूनही पाडली मूर्ती
ज्या ठिकाणी ही मूर्ती होती, ते ठिकाण थायलंडच्या सीमेपासून १०० मीटर दूर अंतरावर आहे. एएफपीच्या रिपोर्टनुसार, गुगल मॅपवरून याबद्दल माहिती घेतल्यास लक्षात येते की, ही मूर्ती सीमारेषेपासून जवळपास ४०० मीटर दूर अंतरावर होती.
चानपन्हा म्हणाले की, "आम्ही बौद्ध आणि हिंदू भाविकांकडून पूजा करण्यात येणाऱ्या प्राचीन मंदिर आणि मूर्तीची तोडफोड केल्याच्या घटनेचा निषेध करतो."
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय?
एक बुलडोजरसारखे वाहन आहे. त्याच्या मदतीने भगवान विष्णूची मूर्ती पाठीमागून धक्का देऊन पाडली जात असल्याचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
एएफपी वृत्तसंस्थेने AI डिटेक्शन टूलच्या मदतीने या व्हिडीओची तपासणी केली. हा व्हिडीओचे विश्लेषण केल्यानंतर या व्हिडीओमध्ये कोणतीही छेडछाड केली गेली नसल्याचे आणि तो मूळ व्हिडीओ असल्याचे स्पष्ट झाले. एएफपीने मूर्ती ज्या ठिकाणी होती, त्या ठिकाणाचीही माहिती घेतली.
थायलंड लष्कराच्या प्रवक्त्यांनी या घटनेवर बोलण्यास नकार दिला. बँकॉकमधील भारतीय दूतावासातील एका माध्यम प्रतिनिधीने एएफपीला सांगितले की, नवी दिल्ली म्हणजे भारताने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
४० जास्त लोकांचा मृ्त्यू
दोन्ही देशात सुरू असलेल्या या लष्करी संघर्षामध्ये आतापर्यंत चाळीसपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. दहा लाख लोक या संघर्षामुळे विस्थापित झाले आहेत. सध्या दोन्ही देश एकमेकांवर संघर्ष भडकावण्याचा आरोप करत आहेत. दोन्ही देशांमध्ये ८०० किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे. त्याच्या आजूबाजूला असलेल्या प्राचीन मंदिरे आणि इतर भूमिवरून हा वाद सुरू आहे.
Web Summary : Tensions escalate between Thailand and Cambodia, with accusations of the Thai army destroying a Vishnu statue near the border. The incident, captured in a viral video, is under investigation amidst ongoing conflict and territorial disputes.
Web Summary : थाईलैंड और कंबोडिया के बीच तनाव बढ़ गया है, थाई सेना पर सीमा के पास विष्णु की मूर्ति को नष्ट करने का आरोप है। वायरल वीडियो में कैद हुई घटना की जाँच चल रही है, साथ ही संघर्ष और क्षेत्रीय विवाद भी जारी हैं।