शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 15:03 IST2020-08-10T14:58:24+5:302020-08-10T15:03:47+5:30
सोशल मीडियावर सध्या दोन चिमुरडी आणि जखमी कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

शाब्बास! २ चिमुरड्यांनी दाखवलेल्या माणुसकीने नेटकऱ्यांचं मन जिंकलं , पाहा व्हायरल फोटो
सोशल मीडियावर माणुसकीची जाणीव करून देणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियावर दोन चिमुरड्यांचा फोटो व्हायरल होत आहे. पाळीव प्राण्यांचं जसं मोठ्या माणसांशी नातं असतं. त्याचप्रमाणे कितीतरी पटीने जास्त प्रेम लहान मुलांचे कुत्रा, मांजर यांसारख्या प्राण्यांवर असतं. एखाद्या मित्राप्रमाणे लहान मुलं आपल्या घरातील किंवा परिसरातील प्राण्याची काळजी घेतात. नेहमी दिसणारं मांजर किंवा कुत्रा एक दिवस जरी दिसला नाही तरी असवस्थ व्हायला होते. सोशल मीडियावर सध्या दोन चिमुरडी आणि जखमी कुत्र्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता ही दोन लहान मुलं कुत्र्याला झालेल्या जखमेवर तात्पुरते उपचार करत आहेत. वेगवेगळ्या रंगाचे पट्ट्या कुत्र्याच्या जखमेवर लावत आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही मुलांच्या निरागसपणामुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा फोटो पाहून अनेकजण भावूकही झाले आहेत.
Two Indian Kings. pic.twitter.com/BcjV7fRIfJ
— Imam of Peace💡 (@Imamofpeace) August 9, 2020
सोशल मीडियावर हा फोटो @Imamofpeace नावाच्या युजरने शेअर केला आहे. 'दोन भारतीय राजे' असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या फोटोला ३६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ५ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स मिळाले असून शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत. सोशल मीडिया युजर्सनी वेगवेगळे कमेंट्स देऊन या चिमुरड्यांचं कौतुक केलं आहे.
याला म्हणतात जुगाड! ऑनलाईन शिकवण्यासाठी बाईंनी वापरला फ्रिजचा ट्रे; फोटो व्हायरल
घर वाहून गेलं, शिक्षणासाठी जमवलेले पैसेही गेले; पण 'त्या' उघड्या मॅनहोलजवळून हलल्या नाहीत!