शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Viral News : कोविडबद्दल सुरू होती Zoom Meeting; अचानक नेत्याची बायको नग्नावस्थेत मागे उभी राहिली अन् मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 11:56 AM

Viral News : तुमच्या मागे उभ्या असलेल्या महिलेनं व्यवस्थित कपडे घातलेले नाही. आम्हाला सगळंकाही दिसत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या एका वर्षापासून जास्तीत जास्त कामं ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  ऑफिस, शिक्षण यांसंबंधी सगळेच  महत्वाच्या विषयांवर प्रत्यक्ष भेटणं टाळून झूम किंवा गुगल मिटच्या माध्यमातून चर्चा केली जात आहेत. अनेकदा , या झूम मीटिंगदरम्यान (Viral Video of Zoom Meeting) अनेकदा विचित्र घटना घडल्याचंही समोर आलं आहे.  सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून असे अनेक व्हिडीओज व्हायरल झाले आहेत. ज्यात तुम्ही ऑनलाईन मिटिंगमधील गोंधळ पाहिले असतील. 

असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. दक्षिण आफ्रिकामध्ये. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणावरील चर्चेसाठी चाललेल्या मीटिंगमध्ये नेत्याची पत्नी विना कपडे आपल्या पतीच्या मागे येऊन उभा राहिली. मीटिंगमध्ये उपस्थित नेत्यांनी आणि खासदारांनी त्यांना त्याचवेळी सांगितलं, की त्यांती पत्नी नग्न अवस्थेत सर्वांना आपल्या स्क्रीनवर दिसत आहे. 

दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील 23 पारंपरिक नेत्यांची संस्था नॅशनल हाऊस ऑफ ट्रेडिशनल लिडर्सचे एक सदस्य Xolile Ndevu मंगळवारी एका बैठकीदरम्यान कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत चर्चा करत होते  Xolile Ndevu सांगत होते की पूर्व कॅपटाउनमध्ये डॉक्टरांसोबत मिळून त्या कशाप्रकारे काम करत आहेत. याचवेळी अचानक त्यांची पत्नी नग्नावस्थेच त्यांच्या मागे दिसू लागली.

काय सांगता राव? औरंगाबादच्या शेतकऱ्यानं पिकवली १ लाख रूपये किलोनं विकली जाणारी भाजी; IAS  म्हणाले....

मीटिंगमध्ये असणाऱ्या एका माणसानं सांगितलं की, ''तुमच्या मागे उभ्या असलेल्या महिलेनं व्यवस्थित कपडे घातलेले नाही. आम्हाला सगळंकाही दिसत आहे.  त्यांना कल्पना नाही का तुम्ही मिटिंगमध्ये आहात त्याची.टट अत्यंत वाईट आहे, जे आम्ही पाहात आहोत. ''

आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ

जेव्हा Xolile Ndevu यांना या गोष्टीची माहिती झाली तेव्हा त्यांनी आपला चेहरा हातानंच झाकून घेतला आणि ते माफी मागू लागले. ते म्हणाले, ''मी गोष्टीबाबत  दिलगीरी व्यक्त करतो. माझं लक्ष कॅमेऱ्यावरच केंद्रीत होतं आणि मी मागे पाहिलंच नाही.  हे तंत्र आमच्यासाठी नवीन आहे आणि याबद्दल आम्हाला प्रशिक्षणही देण्यात आलं नाही. घरच्यांसाठीदेखील हे नवीनच आहे, त्यामुळे आम्ही हे चांगल्या पद्धतीनं  शिकू, पुन्हा असं काही होणार नाही.''

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटकेSocial Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या