Viral News : Brazil nurse gave artificial human touch pics will touch your heart | कोरोना रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी; नर्सनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी....

कोरोना रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी; नर्सनं जे केलं ते पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी....

कोरोनाच्या माहामारीनंतर लोकांच्या जीवनात बरेच बदल झालेले पाहायला मिळाले.  अजूनही लोक कोरोनाच्या गंभीर परिणामांचा सामन करत आहेत. कोरोनाकाळात लॉकडाऊन आणि वाढत्या सोशल डिस्टेंसिंगमुळे लोकांमध्ये एकटेपणा असल्याचं दिसून येत आहे.  याशिवाय कोरोना रुग्णांना क्वारंटाईन राहावं लागत असल्यामुळे त्यांच्याच एकटेपणा आला आहे. असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ब्राझिलमधील एका नर्सनं कोरोना संक्रमित लोकांची मदत करण्यासाठी नवीन आयडिया शोधून काढली आहे.
या नर्सनं रुग्णाचा एकटेपणा घालवण्यासाठी त्याला आर्टिफिशियल ह्यूमन टच म्हणजेच, मानवी स्पर्श देण्याचा प्रयत्न केला आहे. ट्विटरवर गल्फ न्यूज कडून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, देवाचा स्पर्श, नर्स आयसोलेटेड वार्डमध्ये लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. २ डिस्पोजेबल ग्लोव्हज गरम पाण्यानं भरून रुग्णांच्या  हाताला बांधले आहेत. तसंच फ्रंटलाईन वर्कर्सना सलाम असंही म्हटलं आहे. युजर्सनी या फोटोवर कमेंटचा वर्षाव केला आहे. त्यांनी सांगितले की, या फोटोनं त्यांना निःशब्द केलं आहे. नोकरीवरून काढलं; म्हणून त्यानं वचपा काढण्यासाठी सुपरमार्केटवर चालवली कार

हा फोटो ब्राझिलच्या कोणत्या रुग्णालयातील आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही. ब्राझिलमध्ये फेब्रुवारी २०२०नंतर पहिल्यांदा या आठवड्यात ४ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.  मंगळवारी कोरोना व्हायरसमुळे जवळपास ४. १९५ लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण ३, ३७,००० लोकांचा मृत्यू झाला आहे. सोशल डिस्टेंसिंगपासून वाचण्यासाठी पठ्ठ्यानं शोधला जुगाड; फोटो पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Viral News : Brazil nurse gave artificial human touch pics will touch your heart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.