बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:25 IST2025-05-21T13:22:25+5:302025-05-21T13:25:35+5:30
मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.

बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
मध्य प्रदेशातील इंदूरमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका गर्लफ्रेंडने आपल्या बॉयफ्रेंडला मारहाण केली. तरुणीने प्रियकराला नग्न करुन चप्पलांनी मारहाण केली, तसेच छातीवर लाथाही मारल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यावेळी घटनास्थळावरील लोकांनी या सं उपस्थित असलेल्या काही लोकांनी संपूर्ण घटनेचा व्हिडिओही बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मंगळवारी रात्री क्लिफ्टन कॉर्पोरेट बिल्डिंग, स्कीम नंबर ७८ समोर ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला तरुण आणि त्याला मारहाण करणारी मुलगी प्रियकर आहेत. प्रेयसीला तिचा बॉयफ्रेंड दुसऱ्या मुलीला हॉटेलमध्ये घेऊन जात असल्याची माहिती होती. याचा प्रेयसीला राग आला. तरुणी थेट हॉटेलजवळ गेली.
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
यावेळी तरुणीने तिच्या प्रियकराला रस्त्याच्या मधोमध पकडले आणि काहीही न बोलता किंवा ऐकताच, चप्पल आणि लाथांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. रस्त्याने जाणाऱ्यांनी ही घटना त्यांच्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली, यामध्ये ती मुलगी 'मी तुझी पत्नी आहे आणि तू दुसऱ्या मुलीशी बोलतोस!' असे म्हणताना ऐकू आली. तो तरुण दारूच्या नशेत होता आणि पूर्णपणे बेशुद्ध दिसत होता, असे सांगण्यात येत आहे.
हा हाय व्होल्टेज ड्रामा सुमारे २० मिनिटे चालू राहिला. दरम्यान, रस्त्यावरून चालणारे काही लोक हस्तक्षेप करण्यासाठी पुढे आले, परंतु तरुणीने त्यांच्याशी असभ्य भाषेत बोलल्याचे दिसत आहे. यानंतर लासुडिया पोलिस घटनास्थळी अनुपस्थित होते.