Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 15:21 IST2025-10-29T15:16:41+5:302025-10-29T15:21:33+5:30
Viral Reddit story: कॅलिफोर्नियातील एका महिलेसोबत एक अविश्वसनीय किस्सा घडला आहे.

Viral News: रस्त्यावरून खरेदी केले जुने बूट; ब्रँडचं नाव पाहिलं आणि किंमत तपासली; महिला झाली शॉक!
कॅलिफोर्नियातील एका महिलेसोबत एक अविश्वसनीय किस्सा घडला. महिलेने जुने सामान विकणाऱ्या दुकानातून बूट खरेदी केले. तिला वाटले की ती केवळ स्वस्त, सेकंड-हँड बूट खरेदी करत आहे, पण या जुन्या बुटांनी तिला थेट £१,२६० (जवळपास ₹१.३ लाख) किमतीची लॉटरी लावली.
या महिलेने एका थ्रिफ्ट स्टोअरमधून म्हणजेच जुने सामान विकणाऱ्या दुकानातून काळ्या लेदर बूटची एक जोडी खरेदी केली. हे बूट खूप चांगल्या दर्जाचे आणि छान दिसत असल्याने महिलेने फक्त $१७.९९ (भारतीय चलनात सुमारे ₹१,३५०) रुपयांत हे बूट खरेदी केले. बूट खरेदी करून घरी आल्यावर, महिलेने बारकाईने पाहिले आणि तिचा विश्वास बसला नाही. तिने लगेच सोशल मिडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर महत्त्वाची माहिती शेअर केली.

महिलेने सांगितले की, तिने हे बूट खरेदी केले कारण ते खूप चांगल्या दर्जाचे होते, नंतर अचानक तिच्या लक्षात आले की, बूटाचे सोल लाल आहे. मग तिला कळले की, ते ख्रिश्चन लुबाउटिन कंपनीचे बूट आहेत. ब्रँडचे नाव कळताच महिलेने त्याबद्दल इंटरनेटवर शोधायला सुरुवात केली, तेव्हा तिला समजले की, हे बूट त्याच 'एन हायवर लग लो' मॉडेलचे होते. ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर हे बूट £१,२६० (भारतीय चलनानुसार ₹१.३ लाखांहून अधिक) किमतीत विकले जात असल्याचे पाहून महिला चकीत झाली. ₹१,३५० मध्ये खरेदी केलेले बूट चक्क शंभर पटीने जास्त किमतीचे लक्झरी डिझायनर बूट ठरले. या महिलेची कहाणी सध्या इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
ख्रिश्चन लुबाउटिन ब्रँडची खासियत
ख्रिश्चन लुबाउटिन हा एक फ्रेंच लक्झरी ब्रँड आहे, जो १९९० च्या दशकापासून फॅशन जगतात स्टाईल आणि उत्कृष्टतेचे प्रतीक मानला जातो. या ब्रँडची ओळख म्हणजे प्रत्येक शूजचा लाल सोल हाताने बनवलेला असतो, त्यामुळे हा बूट इतर ब्रँडपेक्षा वेगळा आणि अत्यंत महागडा आहे.