नादखुळा! 'सजना तेरे प्यार में' गाण्यावर असे काही नाचले काका की लोक बोलले सुपर से भी उपर....
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 19:10 IST2021-07-21T19:09:32+5:302021-07-21T19:10:13+5:30
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ सर्व नेटीझन्सच लक्ष वेधुन घेतोय. यात नाचतोय एक साधारण माणूस. साधे कपडे, पायात चपलाही नाहीत पण डान्स! कोणालाही वेड लावेल असा. प्रत्येक मुव्ह आणि स्टेप इतकी परफेक्ट की भल्याभल्या नृत्यांगणांना लाजवेल. टॅलेंट शोच्या या भाऊगर्दीत इंटरनेटवरचे हे काका भाव खाऊन जातील.

नादखुळा! 'सजना तेरे प्यार में' गाण्यावर असे काही नाचले काका की लोक बोलले सुपर से भी उपर....
असे अनेकजण आहेत ज्यांच्याकडे जात्याच प्रतिभाशक्ती आणि कौशल्य असते पण परिस्थीतीमुळे ती काही सर्वांच्या समोर येत नाही. अनेकांना तर आपले टॅलेंट दाखवण्याची संधीच मिळत नाही. पण या सोशल मिडियाने हे सोप्प केलं. डान्सिंग अंकल, बाबा जॅक्सन अशा अनेक सोशल पर्सनॅलिटीजना नेटकऱ्यांनी उचलून धरलं. सोशल मिडियाच्या या फ्री प्लॅटफॉर्ममुळे अनेकांना आपले टॅलेंट दाखवण्याची संधी सहज मिळाली. यावर प्रेक्षकांचा प्रतिसादही थेट मिळतो. तसेच तुमचं टॅलेंटचं नाण खणखणीत असेल तर तुम्हाला हमखास प्रसिद्धी मिळते.
इंटरनेटवर सध्या एक व्हिडिओ सर्व नेटीझन्सच लक्ष वेधुन घेतोय. यात नाचतोय एक साधारण माणूस. साधे कपडे, पायात चपलाही नाहीत पण डान्स! कोणालाही वेड लावेल असा. प्रत्येक मुव्ह आणि स्टेप इतकी परफेक्ट की भल्याभल्या नृत्यांगणांना लाजवेल. टॅलेंट शोच्या या भाऊगर्दीत इंटरनेटवरचे हे काका भाव खाऊन जातील. त्यांच्या सफाईदार स्टेप्स बघुन तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा पाहिल्यावाचून राहवणार नाही. हे काका कोण? कुठुन आले? त्यांचा नाव काय? याबद्दल काहीही माहिती नाही. मात्र, त्यांच्या डान्समुळे ते तुमच्या नक्कीच लक्षात राहतील.
गणेश जंगडे याने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या खाली लिहिलंय की यांच्या प्रतिभेला नमस्कार. याला आतापर्यंत १ लाख ३४ हजाराच्या वर व्हिव्ज मिळाले आहेत आणि लाखभर लाईक्सही.
या व्हिडिओमध्ये हे काका, सजना तेरे प्यार में, हम परदेसी हो गये रे या गाण्यावर थिरकतायत. व्हिडिओ सुरु होताच त्यांनी असा काही ठेका धरलाय की तुम्ही त्यांच्या डान्सच्या शंभर टक्के प्रेमात पडाल.