Video - तुफान राडा! 2 तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 18:21 IST2022-09-30T18:16:04+5:302022-09-30T18:21:45+5:30
दोन तरुणी भांडता एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळतं. तसेच त्यांनी एकमेकींचे केसही ओढले.

Video - तुफान राडा! 2 तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन्...
जेव्हा स्त्रिया एकमेकांवर प्रेम करतात, तेव्हा ते मनापासून करतात, पण जेव्हा त्यांच्यात वाद होतात, तेव्हा ते अनेकदा टोकाला जातात. असाच दोन तरुणींच्या भांडणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन तरुणी भांडता एकमेकांच्या जीवावर उठल्याचं पाहायला मिळतं. तसेच त्यांनी एकमेकींचे केसही ओढले. @ViciousVideos ट्विटर अकाउंटवर अजब-गजब व्हिडिओ पोस्ट केले जातात. नुकताच या अकाऊंटवर एक हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
ज्यामध्ये दोन महिला भांडत आहेत. भांडणाचा हा व्हिडीओ दुसऱ्या देशातील असल्याचं म्हटलं जात आहे. दोघींमध्ये हे भांडण नेमकं का झालं याची माहिती समोर आलेली नाही. व्हिडीओमध्ये रस्त्यावर अनेक वाहने उभी असून ते हे दृश्य पाहत आहेत, मात्र त्यांना थांबवायला कोणीच येत नाही. दोघी एकमेकींना लाथा-बुक्क्यांना मारहाण करतानाही दिसत आहेत. व्हिडिओच्या शेवटी दोन-तीन महिला रस्त्याच्या कडेला उभ्या राहून हाणामारी करताना दिसतात.
Fists of fury 🤣 pic.twitter.com/4hREYWowF7
— Vicious Videos (@ViciousVideos) September 29, 2022
भांडणाच्या व्हिडिओला 6 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून काही लोकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने गमतीने हे डब्ल्यूडब्ल्यूई सारख्या मारामारी करत असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने मांजरींसोबत महिलांची तुलना केली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.