शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नादच खुळा! आमदार, खासदारही ऐकेनात; मग म्हस बनली प्रमुख पाहुणी अन् उदघाटनही केलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:52 IST

गावकऱ्यांनी बस स्थानकाच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून चक्क म्हशीला आणले.

गडग । 

अनेकवेळा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर आपल्या मतदारांकडे दुर्लक्ष करतात. अशावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विरोधात जनता रस्त्यावर उतरून आंदोलनं, निषेध अशा मार्गांचा अवलंब करते. मात्र कर्नाटकमधील एका गावातील लोकांनी अनोख्या अंदाजात निषेध व्यक्त केला आहे. तब्बल ४० वर्षांपासून अधिकाऱ्यांनी किंवा आमदाराने बस स्ठानक बांधले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वत: पैसे गोळा करून बसस्थानक बांधले आणि त्याच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून म्हशीला आणले. 

दरम्यान, नेते मंडळींनी गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गावकऱ्यांनी बसस्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चक्क म्हशीला आमंत्रित केले. सध्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेमुळे भारतीय जनता पार्टीचे नेते सत्ताधारी कॉंग्रेसवर जोरदार निशाणा साधत आहेत. 

चक्क म्हशीने केले उद्घाटन ही सर्व घटना कर्नाटक राज्यातील गडग जिल्ह्यातील लक्ष्मेश्वर तालुक्यातील बालेहोसुर गावातील आहे. बालेहोसुर गावातील ग्रामस्थ मागील ४० वर्षांपासून गावात बस स्थानक व्हावे ही मागणी करत होते. बांधकामाअभावी बस स्थानकाचे रूपांतर डम्पिंग यार्डमध्ये झाले. कडक उन्हात आणि मुसळधार पावसात प्रवाशांना या ठिकाणाजवळ बसची वाट पाहावी लागते म्हणून गावकऱ्यांनी अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. 

गावकऱ्यांनी एकत्र येत नारळाच्या फांद्यापासून एक छप्पर तयार केले आणि म्हशीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले. या बसस्थानकाचे उद्घाटन करण्यासाठी म्हशीला सजवून आणण्यात आले आणि नंतर म्हशीच्या उपस्थिती उद्घाटन करण्यात आले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी आणि स्थानिक आमदाराने लवकरात लवकर बसचे शेल्टर बांधणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाKarnatakकर्नाटकMLAआमदार