शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Video : 17 वर्षांची तरुणी रेसर २७५ किमीच्या वेगाने चालवत होती कार, नियंत्रण सुटलं आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 15:07 IST

सध्या मकाऊमध्ये फॉर्म्यूला -३ वर्ल्ड कप रेस सुरु आहे. यात जगभरातील शेकडो रेसिंग प्रेमी सहभागी झाले आहेत.

फॉर्म्यूला रेसच्या गाड्यांचे काळजाचा ठोका चुकवणारे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियात पाहिले असतील. या गाड्यांचा वेग इतका असतो की, अपघात झाल्यावर गाड्यांचा चुराडा होतो. या गाड्यांचा वेगच अपघाताचं कारण बनतो. सध्या मकाऊमध्ये फॉर्म्यूला -३ वर्ल्ड कप रेस सुरु आहे. यात जगभरातील शेकडो रेसिंग प्रेमी सहभागी झाले आहेत. याच रेसमधील एका अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

अपघात झालेली कार कोण चालवत होतं, असा प्रश्न यूजर्सना पडला आहे. ही कार जर्मनीची सोफिया फ्लोरश ही चालवत होती. ही महिला साधारण २७५ किमी प्रति तासाच्या वेगाने गाडी चालवत होती. अशातच तिचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि गाडी हवेत उडत एका होर्डिंगला जाऊन भिडली. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा अपघात फारच गंभीर आहे. या अपघातात सोफियासोबतच जपानचा एक चालक शो त्सुबाई, एक मार्शल आणि दोन फोटोग्राफर जखमी झाले आहेत. 

५ फूट हवेत उडाली कार

सोफिया ही केवळ १७ वर्षांची आहे. पण कार पळवण्याच्या कामात ती चांगल्या चांगल्या रेसर्सना मागे सोडते. बुधवारी तिची रेस होती. सगळंकाही ठिक सुरु होतं. पण अचानक तिचं नियंत्रण सुटलं आणि पाहता पाहता कार हवेत होती. यात कारचं चांगलंच नुकसान झालं आहे. सुदैवाने यात सोफियाचा जीव वाचला आहे. 

सोफियाने ट्विट करुन फॅन्सना धन्यवाद दिले आहेत. तिने लिहिले की, 'मला सर्वांना सांगायचं आहे की, मी ठिक आहे. लवकरच माझी सर्जरी होणार आहे'.

दरम्यान हा अपघात झाल्यावरही रेस सुरुच होती. यात रेडबुल ज्यूनिअर टिमचा रेसर ड्रायव्हर डॅन टिकटुम हा विजयी ठरला. तो १९ वर्षांचा असून ब्रिटनचा आहे.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलAccidentअपघात