Video : बहिणीच्या पतीसोबत अफेअर करणे पडले महागात; नोकरीसाठी मुलाखत सुरू असताना महिलेनं घातला राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 16:43 IST2021-09-14T16:43:20+5:302021-09-14T16:43:39+5:30
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Video : बहिणीच्या पतीसोबत अफेअर करणे पडले महागात; नोकरीसाठी मुलाखत सुरू असताना महिलेनं घातला राडा
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात एक महिला तिच्या स्वतःच्या बहिणीचा जॉब इंटर्व्ह्यू सुरू असताना केबीनमध्ये घुसरी अन् मारामारी करू लागली. ती महिला स्वतःच्याच बहिणीला भयानक पद्धतीनं मारू लागल्यानं साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. पण, तिच्या या रागामागे एक कारण असल्याचे नंतर समोर आले. मार खाणारी महिलेनं तिच्या बहिणीच्या पतीशी अफेअर केलं आणि त्यामुळे हा राडा झाला.
दरम्यान, या व्हिडीओमागचे नेमकी स्टोरी काय यावरून नेटिझन्समध्ये दोन गट पडले. ज्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट केला गेला, त्यावर लिहिलेल्या पोस्टवर अनेकांचा विश्वास बसत नव्हता. पण, या व्हिडीओला लाखभर व्ह्यूअर्स मिळाले आहेत.
पाहा व्हिडीओ...
Wife Crashes Her Sister’s Job Interview After Finding Out She Slept With Her Husband pic.twitter.com/2SzzFPu3kS
— Dallas (@59dallas) September 11, 2021