Video : लॉकडाऊनमध्ये थेट पोलिसांच्या गाडीवर निर्वस्त्र होऊन महिलेचा धिंगाणा, पण का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 14:47 IST2020-04-15T14:39:09+5:302020-04-15T14:47:36+5:30
एका महिलेने जसा कारनामा केला तसा मात्र कुणी केल्याचं दिसलं नाही. याचा व्हिडीओही व्हायरल झालाय.

Video : लॉकडाऊनमध्ये थेट पोलिसांच्या गाडीवर निर्वस्त्र होऊन महिलेचा धिंगाणा, पण का?
वेगवेगळ्या देशांमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान काही लोकांचे विचित्र कारनामेही समोर येत आहे. अनेक लोकांचे व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पण एका महिलेने जसा कारनामा केला तसा मात्र कुणी केल्याचं दिसलं नाही. स्पेनमधील एका महिलेने चक्क पोलिसांच्या कारवर निर्वस्त्र होत धिंगाणा घातला.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा धक्कादायक प्रकार या महिलेने कोर्टातून बाहेर आल्यावर केला. लॉकडाऊन दरम्यान नियमाचं उल्लंघन केल्याच्या आरोपावरून या महिलेला कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
या अज्ञात महिलेने अंगावरील संपूर्ण कपडे काढले आणि पोलिसांचा अटक केली म्हणून विरोध केला. ही घटना स्पेनमधील Costa del Sol resort of Torremolinos समोर घडली. तिला अटक केली तेव्हा तिच्या अंगावर कपडे होते. मात्र, तिला कोर्टात नेण्यात आले तेव्हा तिने हा कारनामा केला.
ही महिला कोरोना व्हायरसच्या लढ्यात सेवा देत असलेल्या लोकांना मानवंदना देताना शेजाऱ्यांशी भांडलीही होती. पण पोलिसांनी तिला लगेच ताब्यात घेतलं. या महिलेचं वय 41 वर्षे असल्याचं सांगण्यात येत आहे.