शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Video : समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन मरत होते व्हेल मासे, लोकांनी अशी केली मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 1:20 PM

आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. पण इथे तसं बघायला मिळालं नाही.

अमेरिकेतील जॉर्जियामधील एक फारच कौतुकास्पद अशा घटनेची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली आहे. येथील East beach St. Simons Island वर माणुसकीचं एक उत्तम उदाहरण बघायला मिळालं. येथील समुद्र किनाऱ्यावर व्हेल मासे मृत्युमुखी पडत होते. पण लोकांनी पुढाकार घेऊन त्यांची मदत केली.

आपण अलिकडे अनेकदा बघतो की, लोक सेल्फीच्या नादात माणुसकी विसरून इतरांना मदत करायचे विसरून जातात. पण इथे तसं बघायला मिळालं नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच व्हेल माशांना पुन्हा समुद्रात ढकलण्यासाठी हातभार लावला. त्यांची मदत करू लागले.

Dixie McCoy ने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केलाय. त्यात लोक कशाप्रकारे व्हेल माशांची मदत करताहेत हे दिसतंय.

(Image Credit : ABC New)

अर्थातच अनेकांना प्रश्न पडला असेल की, असं झालं कसं? इतके व्हेस मासे अचानक समुद्र किनाऱ्यावर येऊन का मरण पावत आहेत? याबाबत Georgia Department of Natural Resources चे बायोलॉजिस्ट क्ले जॉर्ज यांनी सांगितले की, 'अनेकदा असं होतं की, मासे दुसऱ्या माशांचा पाठलाग करत किनाऱ्यावर येतात. किनाऱ्यावर पाणी कमी असतं आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो'.

हे मासे व्हेल माशांची एक प्रजाती आहेत. त्यांना Pilot Whales असं म्हटलं जातं. या माशांचा मनुष्यांना कोणताही धोका नसतो.Dixie McCay यांनी मीडियाला सांगितले की, तिथे २० व्हेल मासे किनाऱ्यावर तडपत होते. तर इतर मीडिया रिपोर्टनुसार, तिथे कमीत कमी ४० ते ५० व्हेल मासे होते. लोक मदत करत होते. माशांची ही प्रजाती फारच दुर्मिळ आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाSocial Viralसोशल व्हायरल