Video - वाह दीदी क्या एन्ट्री मारी! 'पापा की परी' स्कूटी घेऊन आली घरी पण झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 15:51 IST2022-12-03T15:43:00+5:302022-12-03T15:51:59+5:30

तरुणीचं स्कूटी चालवताना नियंत्रण सुटतं आणि भलतंच घडतं. अशाच एका पापा की परीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

video of girl smashes scooty on entry gate social media users called papa ki pari | Video - वाह दीदी क्या एन्ट्री मारी! 'पापा की परी' स्कूटी घेऊन आली घरी पण झालं असं काही...

Video - वाह दीदी क्या एन्ट्री मारी! 'पापा की परी' स्कूटी घेऊन आली घरी पण झालं असं काही...

सोशल मीडियावर दररोज नवनवीन भन्नाट व्हिडीओ हे तुफान व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे अत्यंत मजेशीर असतात. काही व्हिडीओ हे पोट धरून हसायला भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ समोर आला असून तो जोरदार व्हायरल होत आहे. एका तरुणीचं स्कूटी चालवताना नियंत्रण सुटतं आणि भलतंच घडतं. अशाच एका पापा की परीचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुणी घराबाहेर स्कूटीवर बसलेली दिसत आहे. याच दरम्यान तिची स्कूटी स्टार्ट मोडवर असते. घराचा दरवाजा बंद असून ती गेट उघडण्याची वाट पाहत असल्याचे दिसतं. स्कूटी घेऊन जाणारी मुलगी ती स्टार्ट करून पुढे सरकताच ती थेट गेटवर जाऊन धडकली. 

ट्विटरवर @Gulzar_sahab नावाच्या अकाऊंटवरून हा मनोरंजक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यासोबत कॅप्शनही खूप मजेदार आहे. 'वाह क्या एन्ट्री मारी है दीदीने' असं देखील त्यासोबत लिहिलं आहे. ही क्लिप 30 सेकंद पाहिल्यानंतर लोक पोट धरून हसत आहेत. हा व्हिडिओ 3.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 11 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: video of girl smashes scooty on entry gate social media users called papa ki pari