Video - अरेरे! केळी विकायला आलेल्या मुलाची हातगाडी लोकांनी लुटली; 'तो' रडत राहिला पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 12:45 PM2023-05-09T12:45:04+5:302023-05-09T12:50:40+5:30

पाकिस्तानातील लोकांना खाण्यापिण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानातील लोकांना पीठही मिळत नाही.

Video Mob in Pakistan steal from a kid selling bananas on his donkey cart | Video - अरेरे! केळी विकायला आलेल्या मुलाची हातगाडी लोकांनी लुटली; 'तो' रडत राहिला पण...

Video - अरेरे! केळी विकायला आलेल्या मुलाची हातगाडी लोकांनी लुटली; 'तो' रडत राहिला पण...

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील लोकांना खाण्यापिण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तानातील लोकांना पीठही मिळत नाही. काही दिवसांपूर्वी तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात पाकिस्तानातील भुकेले लोक पीठ मिळावे म्हणून ट्रक लुटत होते. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही हैराण व्हाल. 

ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे आणि तिथल्या एका बाजारात केळी विकण्यासाठी आलेल्या मुलाची हातगाडी लोकांनी लुटली. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक लहान मुलगा आधी हातगाडीवर भरपूर केळी आणतो आणि ते पाहून स्थानिक लोकांनी त्याला घेराव घातला, मात्र लोक केळी विकत घेण्याऐवजी लुटण्याच्या उद्देशाने आले. काही वेळ लोक त्याच्याशी बोलत राहिले, पण काही सेकंदांनंतर एक-दोन जणांनी त्याच्या हातगाडीतून केळी उचलली आणि मग पळू लागले. हे पाहून इतर लोकही तसेच करू लागले. 

मुलगा रडत राहिला, विनवणी करत राहिला, पण कोणीही ऐकायला तयार नव्हतं. मात्र, हातगाडीत ठेवलेली केळी वाचवण्यासाठी मुलाने हातगाडीसह पळवायला सुरुवात केली. असं असूनही लोक त्याची केळी घेऊन पळत राहिले. सोशल मीडियावर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना खूप वाईट वाटत आहे.  पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये इतकी उपासमार झाली आहे की विकण्याऐवजी लूट सुरू झाली. 

@crazyclipsonly नावाच्या व्हेरिफाईड अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, "पाकिस्तानमधील जमावाने हातगाडीवर केळी विकणाऱ्या मुलाकडून केळी लुटली." हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. एका युजरने विचारले, "त्याला कोणी मदत केली नाही का?" हा व्हिडीओ जुना आहे हे माहीत असेल, पण पाकिस्तानची अवस्था आधीच बिकट आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर त्याच दाव्यासह शेअर केला जात असून सध्या तो पुन्हा एकदा खूप व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video Mob in Pakistan steal from a kid selling bananas on his donkey cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.