Video : तो वरच्या खिडकीत, ती खालच्या खिडकीत अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून येईल चेहऱ्यावर हसू!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 10:47 AM2020-04-06T10:47:28+5:302020-04-06T10:48:06+5:30

झालं असं की, एका महिला तिच्या घराच्या खिडकीतून आरोग्य कर्मचारांना धन्यवाद देत होती. दरम्यान तिच्या वरच्या घरातील शेजाऱ्याने तिचा आवाज ऐकला.

Video : Man Skillfully Pours Wine For His Neighbour From His Window api | Video : तो वरच्या खिडकीत, ती खालच्या खिडकीत अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून येईल चेहऱ्यावर हसू!

Video : तो वरच्या खिडकीत, ती खालच्या खिडकीत अन् त्यानंतर जे घडलं ते पाहून येईल चेहऱ्यावर हसू!

Next

लॉकडाऊन दरम्यान ड्रोनच्या मदतीने एका मुलीला प्रपोज करणारा आणि तिच्यासोबत डेट करणाऱ्या तरूणाची कहाणी तुम्ही ऐकली असेल. सोशल मीडियातील लोकांनी त्यांची ही लव्हस्टोरी फारच आवडली. अशाच एका दुसऱ्या कपलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

झालं असं की, एका महिला तिच्या घराच्या खिडकीतून आरोग्य कर्मचारांना धन्यवाद देत होती. दरम्यान तिच्या वरच्या घरातील शेजाऱ्याने तिचा आवाज ऐकला. अशात वरच्या खिडकीतील पुरूषाने तिला काहीतरी देण्याचा निर्णय घेतला. व्हिडीओतील कॅप्शननुसार, त्याने तिला वाईट ग्लास आणण्यास सांगितलं. आणि त्याने खिडकीतून वरून तिच्या हातातील ग्लासमध्ये वाईन ओतली.

दरम्यान समोरच्या बिल्डींगमधील एका व्यक्तीने हा क्षण कॅमेरात रेकॉर्ड केला. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याचीही लव्हस्टोरी गाजणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

हा व्हिडीओ लोकांना फारच आवडला असून 30 हजारांपेक्षा जास्त लाईक्स, 3.5 हजारांपेक्षा जास्त रिट्विट आणि 500 K व्ह्यू मिळाले आहेत.


Web Title: Video : Man Skillfully Pours Wine For His Neighbour From His Window api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.