Video! ओव्हर कॉन्फिडन्स नडला, 5.57 कोटी रूपयांची लक्झरी कार घेऊन पाच कारला भिडला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 13:21 IST2020-04-09T13:08:56+5:302020-04-09T13:21:25+5:30
जगात या कारचे काही ठराविकच मॉडल आहेत. मॅनहॅटन शहरात ही कार या व्यक्तीने वेगाने पळवली. त्यावेळी त्याने ड्रग्सची नशा केली होती.

Video! ओव्हर कॉन्फिडन्स नडला, 5.57 कोटी रूपयांची लक्झरी कार घेऊन पाच कारला भिडला...
लॉकडाऊनमुळे अमेरिकेतील नेहमीचे वर्दळीचे रस्ते मोकळे बघायला मिळत आहेत. एका व्यक्तीने विचार केला की, आता जर त्याने या रस्त्यावर वेगाने गाडी चालवली तर अपघात होणार नाही. पण त्याचा हा अंदाज चुकीचा ठरला आणि त्याला कार वेगाने चालवणं इतकं महागात पडलं की, किंमत वाचून तुम्ही चक्रावून जाल.
एका श्रीमंत व्यक्तीने त्याच्या साधारणपणे 5.75 कोटी रूपयांच्या कारचा चेंदामेंदा केला. तो Porsche Mirage GT ही सुपर कार चालवत होता. जगात या कारचे काही ठराविकच मॉडल आहेत. मॅनहॅटन शहरात ही कार या व्यक्तीने वेगाने पळवली. त्यावेळी त्याने ड्रग्सची नशा केली होती.
Just another day in NYC! https://t.co/AwUt8s7BBapic.twitter.com/63meA08fa6
— Joel Fischer (@JFNYC1) April 8, 2020
33 वर्षीय बेंजामिन चेन याचा कारवरील ताबा सुटला आणि त्याने कार एका दुसऱ्या रस्त्यावर पार्क कारला त्याची लक्झरी कार ठोकली. 7 एप्रिलला ही घटना घडली. काही लोकांनी या घटनेचा लगेच व्हिडीओ रेकॉर्ड केला. हा व्हिडीओ व्हायरल झालाय.
यात या लक्झरी कारचं फार मोठं नुकसान झालंय. या कारने आधी एका कारला धडक दिली त्यानंतर चेनने आणखी पाच पाच कारला धडक दिली. यात कारचा पार चेंदामेंदा झालेला दिसतोय. नंतर पोलिसांनी चेनला अटक केली. वेगवेगळे गुन्हे त्याच्यावर नोंदवण्यात आले आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कुणीही जखमी झालं नाही.