Video: सोन्याची बिस्कीट वितळवून तयार केली १ किलो वजनाची सोन्याची चैन, ४८ मिलियन व्हिव्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 17:07 IST2021-10-17T17:06:34+5:302021-10-17T17:07:03+5:30
सोन्याचे दागिने बनवण्याची प्रक्रिया देखील खूप मनोरंजक आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोन्याची बिस्कीट वितळवून सोन्याची १ किलोची साखळी तयार करण्यात आली. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या व्हिडीओमध्ये …

Video: सोन्याची बिस्कीट वितळवून तयार केली १ किलो वजनाची सोन्याची चैन, ४८ मिलियन व्हिव्ज
लोकांना सोन्याचे दागिने घालायला खूप आवडतात. सोन्याचे दागिने घालणे ही भारतात खूप लोकप्रिय परंपरा आहे. पण दागिने बनवण्याची प्रक्रिया देखील खूप मनोरंजक आहे. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सोन्याची बिस्कीट वितळवून सोन्याची १ किलोची साखळी तयार करण्यात आली. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या व्हिडीओमध्ये …
व्हायरल व्हिडीओमध्ये, सोन्याची साखळी बनवताना दाखवलेली आहे. ही सोन्याची चेन तब्बल एक किलो वजनाची आहे. ही सोन्याची साखळी पारंपारिक पद्धतीने बनवलेली आहे. सोन्याची साखळी बनवण्याची ही पारंपारिक प्रक्रिया पाहून लोकही आश्चर्यचकित झाले.
सर्वप्रथम, व्हिडिओमध्ये, एका व्यक्तीला सोन्याची बिस्किटे, व सोन्याच्या इतर वस्तू इतर धातूंमध्ये मिसळताना दिसत आहे. त्यानंतर ही व्यक्ती हे सर्व धातू वितळवते यानंतर, हे मिश्रण तो एका साच्यात ओतून त्यापासून एक रॉड तयार करत आहे. त्यानंतर तो या सोन्याच्या रॉडला आकार देऊ लागतो.
काही काळातच हा सोन्याचा रॉड्स कड्यांमध्ये बदलतो. मग त्या काड्या स्वच्छ केले जातात आणि पॉलिश केल्यानंतर, काही काळाने चमकणारी सोन्याची साखळी तयार होते. हे सर्व इतके सोपे नव्हते. सोन्याच्या साखळ्या अतिशय वेगळ्या पद्धतीने कशा बनवल्या जात आहेत हे व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते.
हा व्हिडिओ सुपरकार ब्लोंडी नावाच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, ज्याला ४८ मिलीयन हून अधिक व्हिव्ज मिळाले आहेत. या व्हिडिओला ८० हजारांहून अधिक लाइक्स आणि अडीच हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.