Video : Husband turns himself into a human chair after people refused offer seat to her pregnant wife in China | Video : शाब्बास रे पठ्ठया! हॉस्पिटलमध्ये कुणीच सीट दिली नाही म्हणून स्वत:च गर्भवती पत्नीसाठी झाला 'खुर्ची'!
Video : शाब्बास रे पठ्ठया! हॉस्पिटलमध्ये कुणीच सीट दिली नाही म्हणून स्वत:च गर्भवती पत्नीसाठी झाला 'खुर्ची'!

पती-पत्नींमधील प्रेम हे वेगवेगळ्या घटनांमधून नेहमीच समोर येत असतं. असंच पती-पत्नीतील प्रेम दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत दिसतंय की, पती त्याच्या गर्भवती पत्नीसोबत हॉस्पिटलमध्ये गेलाय. गर्दी असल्याने बराच वेळ ते वाट बघत उभे होते. आजूबाजूला असलेल्या सीट्सवर लोक बसलेले होते.

बराच वेळ उभे राहून राहून ही गर्भवती महिला थकली होती. पतीने आजूबाजूच्या लोकांना तिला सीट देण्याची विनंती केली, पण कुणी जागचं हलेना. अशात तो स्वत:च पत्नीसाठी खुर्ची बनला आणि पत्नीला पाठीवर बसवले. सोशल मीडियातील लोक त्याला जगातला सर्वात प्रेमळ पती म्हणत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ उत्तर-पूर्व चीनच्या हेइलोंगजियांग प्रांतातील हेगांग शहरातील आहे. हा व्हिडीओ पोलिसांनी रविवारी एका अ‍ॅपवर शेअर केला. त्यावर ७० लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. पती आणि पत्नीचा हा खास क्षण हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता.

लाजिरवाणी गोष्ट म्हणजे पती पत्नीसाठी खुर्ची झाला हे आजूबाजूच्या लोकांना दिसत होतं. तरी सुद्धा कुणी त्यांना सीट ऑफर केली नाही. यावरून लोक किती स्वार्थी आणि बेजबाबदार होत चालले हे दिसून येतं.


Web Title: Video : Husband turns himself into a human chair after people refused offer seat to her pregnant wife in China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.