Video : मस्तच! लॉकडाऊनमध्ये कात्रीशिवाय केस कापण्यासाठी काकांनी केला 'हा' जुगाड
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2020 15:18 IST2020-05-20T15:17:08+5:302020-05-20T15:18:07+5:30
लॉकडाऊनमुळे सलोन, पार्लर सगळंच बंद आहे. पुरूषांना मात्र केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी कधी एकदा सलूनमध्ये पाऊल टाकतोय असं झालंय.

Video : मस्तच! लॉकडाऊनमध्ये कात्रीशिवाय केस कापण्यासाठी काकांनी केला 'हा' जुगाड
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं आणि आता कोरोनाची लागण होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लॉकडाऊनसुद्धा वाढवलं आहे. त्यामुळे घरी बसून लोकांना कंटाळा तर आला आहे . पण या निमित्ताने अनेकजण स्वतःची काम स्वतःचं कमीत खर्चात कशी करायची हे शिकले आहेत.
लॉकडाऊनमुळे सलोन, पार्लर सगळंच बंद आहे. पुरूषांना मात्र केस कापण्यासाठी आणि दाढी करण्यासाठी कधी एकदा सलूनमध्ये पाऊल टाकतोय असं झालंय. अनेकांनी तर न्हाव्याला आपल्या घरी बोलावून घेण्यासाठी प्रयत्न केले. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
This is some next level jugaad 💇🏽♂️ pic.twitter.com/koNq5DildI
— Anup Kaphle (@AnupKaphle) May 17, 2020
या व्हिडीयोमध्ये हे काका लॉकडाऊनमध्ये आपल्या वाढलेल्या केसांना कंटाळले आहेत. त्यामुळेच त्यांनी स्वतःचे केस स्वतःच कापायला सुरूवात केली आहे. ते ही ट्रिमर आणि कैचीचा वापर न करता केस कापले आहेत. हा व्हिडीओ ट्विटरवर @AnupKaphle यांनी शेअर केला आहे.
या व्हिडीओला हा वेगळाच जुगाड आहे, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हिडीओमधील काका खूप साध्या पद्धतीने केस कापताना दिसून येत आहेत. त्यांनी आपल्या कपड्यांवर केस राहू नयेत म्हणून पेपराचा अप्रोन घातला आहे. एक कंगवा आणि क्लिपचा वापर करून काकांनी आपले केस कापले आहेत. काकांनी केस कापण्यासाठी केलेला हा जुगाड सगळ्याच पुरुषांना लॉकडाऊनमध्ये कामी येऊ शकतो. व्हिडीओतून या काकांनी केस कापताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
Video : लॉकडाऊनमध्ये माणसं झालीत रस्त्यांपासून लांब; अन् मोरांनीच केलंय ट्रॅफिक जॅम
साहब मै मजबूर हूँ... गावी जाण्यासाठी मजुराने चोरली सायकल अन् ठेवली चिठ्ठी