Video: Great trick for garlic, if you use this trick, you will never get bored! | Video : लसूण सोलण्याची जबरदस्त ट्रिक, ही ट्रिक वापराल तर कधीच येणार नाही कंटाळा!
Video : लसूण सोलण्याची जबरदस्त ट्रिक, ही ट्रिक वापराल तर कधीच येणार नाही कंटाळा!

लसूण सोलायचं म्हटलं की, अनेकांच्या नाकी नऊ येतात. कारण लसूण सोलायला वेळही खूप लागतो आणि बोटा-नखांचंही नुकसान होतं. तुम्हालाही लसूण सोलायच्या नावाने कंटाळा येत असेल तर एक चांगली ट्रिक तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. सध्या ट्विटरवर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात काही सेकंदात लसूण सोलण्याची ट्रिक दाखवण्यात आली आहे.


रविवारी ट्विटर यूजर @VPestilenz ने एक व्हिडीओ शेअर केलाय. यात केवळ चाकूच्या मदतीने लसूण काही सेकंदात कसा सोलायचा हे दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडीओ सध्या वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतो आहे. यावरून लसूण सोलणाऱ्यांची संख्याही कळून येतीये. अनेकजण या किचन ट्रिकमुळे अचंबित झाले आहेत. लोक हा व्हिडीओ पाहून लसूण सोलण्याची ट्रिकही शिकत आहेत आणि व्हिडीओ शेअर करून त्यावर मजेदार कमेंटही करत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत ११.८ मिलियन व्ह्यूज मिळाले असून ३०८K लोकांनी हा व्हिडीओ पसंत केला आहे.


Web Title: Video: Great trick for garlic, if you use this trick, you will never get bored!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.