एका गाडीवरून तब्बल पाच तरूण प्रवास करत आहेत. तिघे सीटवर बसले आहेत. एक पाठीमागे सामान बांधायच्या ठिकाणी, तर एक तरुण चक्क पाय ठेवतो तिथे उभा आहे. हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांनी वाहतूक नियमांनाच वाकुल्या दाखवल्या. पण, पोलिसांनी त्यांना शोधलं आणि असा दंड ठोठावला की, परत त्यांची असं करण्याची हिंमतही होणार नाही.
ही घटना घडली आहे हापुडमध्ये. व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील पिलखुवा तालुक्यातील आहे. व्हिडीओ बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की पाचही तरुण स्टंट करण्याच्या नादात किती जीवघेणा प्रवास करत आहे.
एक मोटारसायकल आणि पाच तरुण या व्हिडीओमध्ये दिसत आहे. एक तरुण तर चक्क दुचाकीवर बसल्यानंतर पाय ठेवतात त्या जागेवर उभा आहे. दुचाकी चालवताना तोल गेला असता तर पाचही तरुण पडले असते. पण आजूबाजूने जाणाऱ्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. सुदैवाने असं काही घडलं नाही.
पोलिसांनी किती दंड ठोठावला?
तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर एका व्यक्तीने पोस्ट केला. त्यानंतर हापुड पोलिसांनी चक्रे फिरवली आणि मोटारसायकलच्या मालकाला शोधलं.
वाहतूक पोलीस छवी राम यांनी या घटनेबद्दल सांगितलं की, सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला तरुण धोकादायक पद्धतीने दुचाकी चालवल्याबद्दलची माहिती मिळाली होती. पोलिसांनी मोटारसायकलची माहिती घेतली आणि ३१ हजार रुपये दंड ठोठावला आहे.
Web Summary : Five youths risked lives on a bike in Hapur, Uttar Pradesh, performing dangerous stunts. Police located the bike's owner and imposed a ₹31,000 fine, deterring future reckless behavior and upholding traffic rules. The video went viral.
Web Summary : उत्तर प्रदेश के हापुड़ में पांच युवकों ने बाइक पर खतरनाक स्टंट कर जान जोखिम में डाली। पुलिस ने बाइक मालिक का पता लगाकर ₹31,000 का जुर्माना लगाया, ताकि भविष्य में ऐसी लापरवाही न हो और यातायात नियमों का पालन हो। वीडियो वायरल हो गया।