डेहराडून: जंगली प्राणी रहिवासी भागात शिरल्याचे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. काहीवेळा हे प्राणी कोणालाही इजा न पोहोचवता निघून जातात, तर काहीवेळा हल्ले करतात. अशाच प्रकारची घटना डेहराडूनच्या लच्छीवाला टोल प्लाझावर घडली आहे. टोल प्लाझावर एका जंगली हत्तीने कारवर हल्ला केला, ज्यात कारची मागील काच तर फुटलीच, शिवाय मागील बाजून दाबली गेली. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लच्छीवाला टोल प्लाझावर अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. यापैकी एक कारण म्हणजे, येथून जाणारे हत्ती. हत्ती अनेकदा टोल प्लाझावर येतात आणि शांतपणे रस्ता ओलांडून निघून जातात. मात्र, यावेळी हत्तीने कारवर हल्ला केला. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, अनेक गाड्या टोल प्लाझा पार करत आहेत, यावेळी एक हत्ती तिथे येतो. हत्तीला पाहून चालक कार पळवण्याचा प्रयत्न करतो, मात्र तोपर्यंत हत्ती कारवर हल्ला करतो. यात गाडीची मागील काच फुटते. तो हत्ती जास्त नुकसान करणार, त्यापूर्वीच चालक तेथून पळ काढतो. हत्तीदेखील त्यानंतर जंगलाच्या दिशून निघून जातो. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वन विभागाने गस्त वाढवलीलच्छीवाला रेंजर मेधावी कीर्ती म्हणाल्या की, विभागीय पथक या भागात गस्त घालत आहे. टोल प्लाझावर हत्तींच्या हालचाली लक्षात घेऊन लोकांनाही सतर्क करण्यासाठी बॅनर लावण्यात आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या टोल प्लाझाच्या थोडे पुढे असलेल्या मणिमाई मंदिराजवळ हत्तीने कांवड यात्रेकरुंच्या ट्रकवर हल्ला केला होता. ट्रकवर मोठ्या आवाजात गाणे सुरू होते, ज्यामुळे हत्तीने घाबरुन ट्रॅक्टरवर हल्ला चढवला होता.