Video : रात्रभर ढोसली दारु, मॉर्निंग वॉकला गेला आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 13:42 IST2018-10-19T13:33:04+5:302018-10-19T13:42:21+5:30
दारुच्या नशेत लोकं काय काय धिंगाणा घालतात हे आपण सर्वांनीच पाहिलं आणि ऐकलं असेलच. अशा घटनांचे एक नाही अनेक मजेदार आणि धक्कादायक किस्से तुम्ही ऐकले असतील.

Video : रात्रभर ढोसली दारु, मॉर्निंग वॉकला गेला आणि...
दारुच्या नशेत लोकं काय काय धिंगाणा घालतात हे आपण सर्वांनीच पाहिलं आणि ऐकलं असेलच. अशा घटनांचे एक नाही अनेक मजेदार आणि धक्कादायक किस्से तुम्ही ऐकले असतील. पण एक नवा आणि मजेदार किस्सा समोर आला आहे. ही घटना आहे थायलंडमधील.
एक व्यक्ती सकाळी ५ वाजता गटारात असा काही पडला की, त्याला बाहेर काढायला दीड तास लागला. इतकंच नाही तर चिखलात फसलेला असतानाही तो त्याच्या मित्राला सिगारेट मागत होता.
ही घटना बुधवारची आहे. ३२ वर्षाचा सोनपोन्ग सिंगसिता त्याचा मित्र सोंगका कमसंगसोबत होता. रात्रभर दोन्ही मित्रांनी भरपूर दारु ढोसली. सकाळी सोमपोन्ग अचानक वॉकसाठी हट्ट करु लागला. दोघे मित्र मॉर्निंग वॉकला गेले सुद्धा. पण त्यानंतर जे झालं ते मजेदार होतं.
या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. असे सांगितले जात आहे की, सोमपान्ग जेव्हा मॉर्निंग वॉक करत होता, तेव्हाच सिगारेट ओढताना तो एका चिखलाच्या तलावात पडला. तो इतका नशेत होता की, त्याला उठणही कठीण झालं होतं.
सोमपोन्गला त्याच्या मित्राने आवाज दिला तेव्हा चिखलातून तो म्हणाला की, 'मी येथून बाहेर येऊ शकत नाहीये. पण मी ठिक आहे. बरं ऐक, आधी एक सिगारेट दे'.
सोमपोन्ग त्या चिखलात जवळपास दीड तास तसाच पडलेला होता. त्यानंतर आलेल्या बचाव पथकाने त्याला क्रेनच्या मदतीने बाहेर काढले. इतकेच नाही तर सोमपोन्गला बाहेर काढल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं. कदाचित तो इतका नशेत होता की, त्याला त्याच्यासोबत काय झालं हेच लक्षात येत नव्हतं. म्हणून ते हसत असावा.