Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:37 IST2025-10-08T09:33:05+5:302025-10-08T09:37:56+5:30
या युवकाचा घटस्फोट साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
सध्याच्या काळात पती-पत्नी यांच्यातील वाद वाढलेले दिसून येतात. ज्यामुळे बरेच लोक घटस्फोटाचा मार्ग पत्करतात. घटस्फोटाची प्रक्रिया दीर्घ काळ चालणारी असते. त्यामुळे जेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा संबंधित सुटकेचा नि:श्वास सोडतात. अलीकडे एक व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवक घटस्फोटानंतर सेलिब्रेशन करताना दिसतो. या आनंदापूर्वी तो दुधाने आंघोळ करतो, त्यानंतर नवीन कपडे आणि बूट घालतो. मग केकही कापतो. सोशल मीडियावर या युवकाच्या व्हिडिओची बरीच चर्चा सुरू आहे. अनेकांनी त्याच्या या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या युवकाचा घटस्फोट साजरा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत त्याची आई त्याला दुधाने आंघोळ घालताना दिसते. त्यानंतर तो कपडे घालून "Happy Divorce" लिहिलेला केक कापतो. त्याची आई देखील या सेलिब्रेशनमध्ये सहभागी असते. ती खूप आनंदी दिसते आणि मुलाच्या आनंदात त्याला प्रोत्साहन देते. २५ सप्टेंबर रोजी इंस्टाग्राम युजर बिरादर डीके याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये तो आंघोळ करताना, नवीन कपडे घालताना आणि नंतर केक कापताना दिसत आहे.
१२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये रोख
व्हिडिओच्या सुरुवातीला आई मुलावर दुधाने अभिषेक करताना दिसते. त्यानंतर बिरादारचा केक कापण्याचा कार्यक्रम होतो. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये बिरादारने लिहिलंय की "कृपया आनंदी राहा आणि स्वतःचा आनंद साजरा करा, दुःखी होऊ नका. १२० ग्रॅम सोने आणि १८ लाख रुपये रोख घेतले नाहीत तर दिले आहेत. आता मी अविवाहित आहे, आनंदी आहे, स्वातंत्र्य आहे, माझे जीवन, माझे नियम आहे."
दरम्यान, या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यात बऱ्याच जणांनी त्याचे अभिनंदन केले आहे. काही युजरने त्याला आता पुन्हा लग्न करू नकोस, तुझी आई तुझी काळजी घेण्यास समर्थ आहे असं म्हटले. तर काहींनी सिंगल फाइफ चांगली आहे अशी कमेंट केली आहे.