VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:29 IST2025-08-05T16:27:03+5:302025-08-05T16:29:49+5:30

Bull Fight Viral Video: भररस्त्यात दोन बैलांमध्ये जुंपली तेव्हा सारेच घाबरले...

VIDEO A girl riding a scooty was hit hard in a fight between two bulls she fell on the road and then | VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...

Viral Video: हल्ली इंटरनेटवर काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. कधी चांगल्या गोष्टी व्हायरल होतात, तर कधी चुकीच्या गोष्टींना उगाच प्रसिद्धी मिळते. पण सोशल मीडिया हे एक असे माध्यम असते ज्यावरून एका छोटाशा गावखेड्यात घडलेली छोटीशी घटना संपूर्ण जगभरात पोहोचते. असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडीओत दोन बैलांमध्ये तुफान राडा (Bull Fight Video) सुरू असल्याचे दिसते. त्यावेळी पुढे काय घडते ते पाहून तुम्हालाही भीती वाटेल.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक स्कूटीवर जाणारी मुलगी दोन बैलांमधील लढाईत अडकते. ही घटना छत्तीसगडमधील रायपूर येथील समता कॉलनी येथील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन बैल एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. ज्यामुळे आजूबाजूचे वातावरण तणावपूर्ण बनते. याचदरम्यान, एक मुलगी तिच्या स्कूटरवरून जात असते आणि बैलांना भांडताना पाहून ती स्कूटर वळवण्याचा प्रयत्न करते. पण कदाचित तिची वेळ चुकते.

मुलगी स्कूटी वळवत असतानाच एक बैल दुसऱ्या बैलाला जोरात धडक मारतो, ज्यामुळे तो बैल थेट मुलीवर पडतो. बैलाचा जोरदार धक्का लागल्याने मुलगी स्कूटीसह रस्त्यावर पडते. पण पडल्यानंतरही मुलगी हार मानत नाही, ती लगेच उठते. पाहा व्हिडीओ-


हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @iamankit.____ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, ज्याला आतापर्यंत ७४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. तसेच ते त्या मुलीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

Web Title: VIDEO A girl riding a scooty was hit hard in a fight between two bulls she fell on the road and then

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.