Video : रडणाऱ्या धाकट्या भावाला गप्प करण्यासाठी चिमुरड्यानं केली अशी आयडिया; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 12:52 PM2021-03-16T12:52:58+5:302021-03-16T13:06:05+5:30

Younger brother with deep breath video : दीर्घश्वास घेतल्यानंतर हळूहळू श्वास सोडल्यानं कसं शांत  राहता येईल याबाबत हा चिमुरडा शिकवताना दिसून येत आहे.

Video : 6 year old kid calming his younger brother with deep breath video will teach you | Video : रडणाऱ्या धाकट्या भावाला गप्प करण्यासाठी चिमुरड्यानं केली अशी आयडिया; पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : रडणाऱ्या धाकट्या भावाला गप्प करण्यासाठी चिमुरड्यानं केली अशी आयडिया; पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

आपल्या लहान भावडांना चांगली वागणूक देणं हे नेहमीच मोठ्या भाऊ, बहिणीचं कर्तव्य असतात. पण खूप कमी मोठी भावंडं अशी असतात जी आपल्या लहान बहिण किंवा भावाकडे व्यवस्थित लक्ष देतात. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ याआधी तुम्ही कधीही पाहिला नसेल.

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता मोठा भाऊ लहान भावाला शांत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावेळी तो लहान भावाला दीर्घ श्वास कसा घ्यायचा हे शिकवत आहे. दीर्घश्वास घेतल्यानंतर हळूहळू श्वास सोडल्यानं कसं शांत  राहता येईल याबाबत हा चिमुरडा शिकवताना दिसून येत आहे.

B⚘ O⚘ Y⚘ MOM या ट्विटर युजरनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून या व्हिडीला कॅप्शन दिलं आहे की, ''माझा चार वर्षांचा मुलगा खूपच नखरेवाला आहे. त्यामुळे माझा ६ वर्षांचा मोठा मुलगा त्याला दीर्घश्वास घेऊन शांत कसं राहायचं याबाबत सांगत आहे. '' शेतात सापडली ३००० वर्ष जुनी कांस्याची तलवार; अवस्था पाहून पुरात्व विभागही झाला चकीत....

 हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत  ५ लाखांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.  ५२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. नेटकरी या व्हिडीओवर कमेंट्सकरून या मुलांना शाब्बासकी देत आहेत. Viral : ऑनड्यूटी स्तनपान करत होती महिला पोलिस; फोटो व्हायरल होताच अधिकाऱ्यांनी मागितली माफी

Web Title: Video : 6 year old kid calming his younger brother with deep breath video will teach you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.