डर के आगे जीत है! खारीकडून मांजरीला धोबीपछाड....व्हिडिओ पाहुन हसू आवरणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 18:31 IST2021-07-21T18:30:14+5:302021-07-21T18:31:03+5:30
एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओत एका इवल्याश्या जीवाची एका मोठ्या जीवाशी फाईट दाखवली आहे. ही फाईट पाहुन तुमचा दिवस मस्त जाईल तसेच तुम्हाला काहीतरी शिकायलाही मिळेल.

डर के आगे जीत है! खारीकडून मांजरीला धोबीपछाड....व्हिडिओ पाहुन हसू आवरणार नाही
असं म्हणतात की कधीही कुणाला कमी समजु नये. कारण मुर्ती किती जरी लहान असली तरी त्याची किर्ती महान असते. काही लहान प्राणीही ही उक्ती तंतोतंत खरी ठरवतात. एखाद्या मुंगीने ठरवलं तर ती हत्तीच्याही नाकात दम करू शकते. अशी गोष्ट आपण सर्वांनीच लहानपणी ऐकली असेल. असाच एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतोय. या व्हिडिओत एका इवल्याश्या जीवाची एका मोठ्या जीवाशी फाईट दाखवली आहे. ही फाईट पाहुन तुमचा दिवस मस्त जाईल तसेच तुम्हाला काहीतरी शिकायलाही मिळेल.
'डर के आगे जीत है' pic.twitter.com/VqfsEXblC5
— @kumarayush (@kumarayush084) July 20, 2021
इंटरनेटवर एका छोट्याश्या खारुताईचा आणि मांजराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. काही व्हिडिओ असे असतात जे आपल्याला अंर्तमुख करायला लावतात. तर काही हसायला लावतात. हा व्हिडिओ अंर्तमुख करणाराही आहे आणि थोडसं हसायला लावणाराही आहे. यात मांजरीची आणि खारीची फाईट आहे पण खारीने मांजरीला धोबीपछाड केलंय.
सुरुवातीला खारुताई मटकन उडी मारुन मांजरीसमोर बसते. त्यावर मांजर खारुताईवर हल्ला करते. मात्र खारुताई मांजरीचे तोंड असे काही पकडते की मांजरीला दिसेनासे होते. मांजर झटपट करते पण काहीच करू शकत नाही. हिच संधी साधुन खारुताई मांजरीच्या पाठीवर बसते आणि मस्त मांजरीच्या पाठीवरून फिरते.
या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स येत आहेत. काही जण म्हणतायत, डर के आगे जीत आहे. काही म्हणतायत, कोणालाही लहान समजू नये. अनेकांनी वेगेवळ्या ढंगात या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.