UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2019 16:18 IST2019-04-10T16:17:43+5:302019-04-10T16:18:59+5:30

कनिष्कनं या यशाचं श्रेय स्वतःच्या गर्लफ्रेंडला देऊन टाकलं.

upsc cse topper kanishak kataria love story twitter reaction on kanishak kataria girlfriend | UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती'

UPSC टॉपर कनिष्‍क कटारियानं ज्या गर्लफ्रेंडला म्हटलं ThankYou, जाणून घ्या कोण आहे 'ती'

नवी दिल्ली- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा अर्थात यूपीएससी 2018च्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले. त्या परीक्षेत कनिष्क कटारिया देशात पहिला आला. कनिष्कनं या यशाचं श्रेय स्वतःच्या गर्लफ्रेंडला देऊन टाकलं. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर कनिष्कच्या गर्लफ्रेंडची चर्चा झाली. विशेषतः बऱ्याचदा मुलं आपल्या यशाचं श्रेय हे आई-वडिलांना देतात, पण कनिष्कनं गर्लफ्रेंडला याचं क्रेडिट दिलं आहे. मागासवर्गातून आलेल्या कनिष्कनं UPSCच्या सिव्हिल सेवा परीक्षेत टॉप करण्याचं श्रेय गर्लफ्रेंडला दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर कनिष्क आणि त्याची गर्लफ्रेंड चर्चेत आली आहे. काहींनी त्याच्या गर्लफ्रेंडला ‘couple goals’ म्हटलं आहे.


तर काहींनी UPSC टॉपर बुद्धीमुळे नव्हे, तर हृदयामुळे चर्चेत आहे. तर एका युजर्सनं म्हटलं आहे की, परिस्थिती बदलतेय. माझ्या वडिलांनी 10वीच्या परीक्षेच्या तीन दिवसांआधीच माझ्या गर्लफ्रेंडचं लेटर पकडलं होतं. ती तिच्या छोट्या भावाच्या माध्यमातून मला पाठवायची. त्यानंतर मला वडिलांनी बेदम चोपला, पट्ट्यानं मार दिला. परंतु कनिष्कनं या सर्व यशाचं श्रेय थेट गर्लफ्रेंडला दिल्यानं तो सर्वांच्याच लक्षात राहील.

 कोण आहे कनिष्कची गर्लफ्रेंड
कनिष्क कटारिया हा जयपूरला वास्तव्याला आहे. कोरियातल्या एका सॅमसंग कंपनीत तो काम करत होता. देशाची सेवा करण्याच्या हेतूनं कनिष्कनं नोकरी सोडली आणि तो भारतात परतला. इथे येऊन त्यानं एक स्टार्टअप कंपनी काम केलं. त्याचबरोबर UPSC परीक्षेची तयारी केली. कनिष्कनं पहिल्यांदाच परीक्षला दिली आणि तो टॉपर ठरला. कनिष्क कटारियाची गर्लफ्रेंड ही जपानमध्ये वास्तव्याला आहे. ते दोघे बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत.

 

Web Title: upsc cse topper kanishak kataria love story twitter reaction on kanishak kataria girlfriend