सोशल मिडिया दररोज काहीतरी नवीन पाहायला मिळते. परंतु, कधी अशा काही गोष्टी दिसतात ज्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. सध्या असाच एक 'मेकअप'शी संबंधित व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच कमेंट्सचा पूर आला आहे. नेटकऱ्यांनी पार्लरवाल्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी अतिशय सुंदर नटलेली दिसत आहे. अंगावर सुंदर साडी, दागिने आणि चेहऱ्यावर प्रोफेशनल मेकअप यामुळे तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे. मात्र, काही सेकंदातच चित्र बदलते. जेव्हा तरुणी आपला मेकअप पुसायला सुरुवात करते, तेव्हा तरुणांच्या पायाखालची जमीन सरकते. मेकअप काढल्यानंतर तरुणी पूर्णपणे वेगळी दिसू लागते आणि पाहणाऱ्यांना आपल्या डळ्यावर विश्वास बसत नाही.
हा व्हिडीओ एक्स प्लॅटफॉर्मवर @MemeCreaker नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला. या व्हिडीओला दिलेले कॅप्शन सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. कॅप्शनमध्ये , "पार्लरमधील लोकांना नरकात वेगळं उत्तर द्यावं लागेल!", असे लिहिले आहे. आतापर्यंत २० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट
एक युजर म्हणाला की, "किमान देवाला तरी घाबरा, ही तर सरळ सरळ फसवणूक आहे." दुसऱ्याने गमतीत लिहिले आहे की, "बिचाऱ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, त्याची फसवणूक झाली आहे." तिसऱ्याने तर हद्दच केली. तो म्हणाला की, "या पार्लरवाल्यांसाठी यमराज वेगळं तेल गरम करतील, किती ही क्रूरता!"
Web Summary : A viral makeup video shows a woman's shocking transformation. After removing the makeup, her appearance drastically changes, leaving viewers stunned and sparking outrage online. Users are calling it a complete deception.
Web Summary : वायरल मेकअप वीडियो में एक महिला का चौंकाने वाला परिवर्तन दिखाया गया है। मेकअप हटाने के बाद, उसकी उपस्थिति नाटकीय रूप से बदल जाती है, जिससे दर्शक दंग रह जाते हैं और ऑनलाइन आक्रोश फैल जाता है। यूजर्स इसे धोखा बता रहे हैं।