Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:12 IST2025-08-29T17:11:52+5:302025-08-29T17:12:39+5:30

Lion Fight Video : सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये या भयानक लढाईची झलक दिसून येते.

two lions fight video goes viral on social media online battle of supremacy watch trending | Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?

Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?

Lion Fight Video : सोशल मीडिया हे हल्लीच्या पिढीचे प्रभावी माध्यम आहे. याच सोशल मीडियावरून काही सेकंदात संपूर्ण जगाशी कनेक्शन जोडता येते. सोशल मीडियावर विविध गोष्टींची चर्चा रंगल्याचे दिसते. अनेकदा काही व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतात. जंगलातील वन्य प्राण्यांचे फोटो किंवा व्हिडीओ पाहण्यास खूपच मज्जा येते. पण ज्या सिंहांच्या नावाने जंगलातील इतर प्राणी चळचळा कापतात, ते दोन सिंहच एकमेकांशी भिडले तर... ते दृश्य कसे असेल याची कल्पनाही करू शकत नाही. पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये या भयानक लढाईची झलक दिसून येते.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दोन सिंहांच्यात वर्चस्वासाठीची लढाई सुरु आहे. त्यामुळेच इंटरनेटवर या व्हिडीओने खळबळ उडवून दिली आहे. हे दृश्य दक्षिण आफ्रिकेच्या माडिक्वे गेम रिझर्व्हमधील असल्याचे सांगितले जात आहे. छायाचित्रकार तेबाट्सो रोझ टेमा यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात हे दृश्य कैद केले आहे. lionsightings नावाच्या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दोन वेगवेगळ्या कुटुंबातील सिंह एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. दोघेही खूप मजबूत आहेत, त्यामुळे कोण जिंकेल याचा अंदाज लावणे कठीणच. पाहा व्हिडीओ-


सुमारे ४५ सेकंद चाललेल्या या लढाईत, दोघेही एकमेकांवर हल्ला चढवतात. अधी एक सिंह दुसऱ्या सिंहावर हल्ला करतो. पण दुसरीकडे दुसरा सिंहही हार मानत नाही. तोदेखील त्याच्या शक्तिशाली नखांनी समोरच्यावर हल्ला करतो. जेव्हा या भयंकर लढाईचा कोणताही निकाल लागत नाही, तेव्हा दोन्ही सिंह आपापल्या मार्गाने निघून जातात. या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सारेच यावर व्यक्त होत आहेत.

Web Title: two lions fight video goes viral on social media online battle of supremacy watch trending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.