ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:42 IST2023-01-16T16:40:35+5:302023-01-16T16:42:46+5:30
प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे.

ऐकावं ते नवलचं! 23 वर्षीय शिक्षिकेचा 16 वर्षीय विद्यार्थ्यावर जडला जीव, मुलासोबत झाली फरार अन्...
प्रेमात कधीही काहीही होऊ शकते. प्रेम कोणावरही होऊ शकते. प्रेम अंधळ असत म्हणतात. अशीच प्रेमाची एक घटना समोर आली आहे. ही घटना नोएडा येथील आहे. एका 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या प्रेमात 23 वर्षीय शिक्षिका पडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
नोएडाच्या सेक्टर-123 येथील उन्नती विहार कॉलनीमध्ये राहणारे विजय शुक्ला यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या 16 वर्षांच्या मुलाला शिकवणी देत असलेल्या 23 वर्षीय शिक्षिकेने मुलाचे अपहरण केले असल्याचे म्हटले आहे. मुलाच्या वडिलांनी या शिकवणी शिक्षकाविरुद्ध सेक्टर-113 पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
उद्या आफताबची नार्को टेस्ट? श्रद्धाच्या हत्येचा उलगडा होणार
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, उन्नती विहार कॉलनीतील रहिवासी विजय शुक्ला यांनी तक्रार दाखल केली, त्यांचा 16 वर्षांचा मुलगा अनुराग शुक्ला याच कॉलनीत राहणाऱ्या आयशा नावाच्या शिक्षिकेकडे शिकवणीसाठी जात होता. शिक्षिकेने मुलाचे अपहरण करून फरार झाल्याचा आरोप विजय शुक्ला यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना शिक्षिका विद्यार्थ्याला पसंत करत होती अस समोर आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत.