शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

बाबो! भर मंडपात मुलीने नवरदेवाला केला पळून जाण्याचा इशारा? जाणून घ्या Viral व्हिडीओमागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 16:12 IST

Social Viral : हा व्हिडीओत नुसता व्हायरल झाला असं नाही तर व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यातील तरूणीला आणि नवरदेवाला मनस्तापही झाला आहे. 

सोशल मीडियावर अलिकडे लग्नातील वेगवेगळे मजेदार व्हिडीओ अधिकच व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडीओ काही मिनिटांमध्येच इतके चर्चेत येतात की, सगळीकडे त्यांची चर्चा होत राहते. असाच एक लग्नातील मजेदार व्हिडीओ सध्या  चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओत नुसता व्हायरल झाला असं नाही तर व्हिडीओ व्हायरल (Viral Marriage Video)  झाल्यावर यातील तरूणीला आणि नवरदेवाला मनस्तापही झाला आहे. 

हा व्हिडीओ एका मराठमोळ्या लग्नातील असल्याचं लगेच लक्षात येतं. स्टेजवर नवरी-नवरदेव लग्नाचे रितीरिवाज करण्यास बसले आहेत. अशात एक मुलगी नवरदेवाला पळून चल असा इशारा करताना दिसत आहे. या व्हिडिओ मागचं सत्य समोर आलं आहे. (हे पण बघा : VIDEO : टल्ली होऊन लग्नात पोहोचला नवरदेव, नवरीने केलं असं काही बघत राहिले सगळे!)

गेल्या आठवड्यात मुंबईत हा लग्न सोहळा पार पडला. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यावर असं वाटलं की, हा सगळा प्रकार खरंच नवरदेवासोबत घडला. पण असं काही नाहीये. ही केवळ मित्रांमधील गंमत होती आणि ती गंमतच दोघांच्याही मनस्तापाचं कारण ठरली आहे. नवरदेव विजय मुणगेकर याची अंकिता प्रभू वालावलकर ही मैत्रिण आहे. लग्नावेळी थट्टा मस्करी सुरू असताना हा व्हिडीओ काढला. हा व्हिडीओ अवघ्या काही दिवसांतच सोशल मीडियावर व्हायरल झाला.  (हे पण बघा : Viral Video : स्टेजवरच सुटला नवरदेवाचा पायजमा अन् खदकन हसली नवरी....)

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, अंकिता आपला नवरदेव मित्र विजयला गमतीत चल पळून जाऊ....असा इशारा करत आहे. तिला इशाऱ्यातच उत्तर देत विजय म्हणतो की,'आता काय करणार? जाऊ दे'. दोघांच्याही या इशाऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

गंमत म्हणून रेकॉर्ड केलेल्या या व्हिडीओमुळे नवरदेव विजय आणि नवरी मयुरी सोशल मीडियावर चर्चेत आले. या व्हिडीओमुळे त्यांची थोडी अडचण होत आहे. मस्करीत केलेल्या या व्हिडिओमुळे त्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. सोशल मीडियावर काहीही शेअर करताना विचार केला नाही तर असाच मनस्ताप होऊ शकतो हे दिसून येतं.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेmarriageलग्न