VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:58 IST2025-09-11T13:57:25+5:302025-09-11T13:58:11+5:30

Truck Hand brake viral video : रस्त्यावर एखादी छोटीशी चूकही किती महागात पडू शकते याचं उदाहरण व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते

trending video two cars accident truck roadside hand brake watch viral social media | VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...

VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...

Truck Hand brake viral video : ड्रायव्हिंगची शिस्त हा सध्या सर्वांच्याच चर्चेचा आणि चिंतेचा विषय बनला आहे. वाहनांची वाढती संख्या आणि चालकांमध्ये शिस्तीचा अभाव या दोन गोष्टींमुळे हल्ली रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा आपली चूक नसतानाही आपल्याला किंवा आपल्या वाहनाला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळेच हल्ली रस्त्यावरून तुम्ही जात असाल तर तुम्हाला खूप काळजी घेण्याची गरज आहे, कारण इतरांच्या चुकीमुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो.

आजकाल असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामुळे लोक थक्क झाले आहेत. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की एक छोटीसा निष्काळजीपणा किती मोठी दुर्घटना बनते. एक ट्रकचालक गाडी बाजूला पार्क केल्यानंतर हँडब्रेक लावायला विसरतो, त्यानंतर काही सेकंदात त्याच्या मागे उभ्या असलेल्या कारवर तो ट्रक आदळतो आणि मागेमागे जात राहतो. घडलेला प्रकार कारमालक हतबल होत पाहत राहतो. यानंतर, ट्रक दुसऱ्या कारशी आदळतो आणि नंतर कारसह ट्रक दरीत कोसळतो. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @InsaneRealitys या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'हँडब्रेक लावायला कधीही विसरू नका'. फक्त ३१ सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि खूप शेअरही केला आहे.

Web Title: trending video two cars accident truck roadside hand brake watch viral social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.