India Bangladesh: बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचारामुळे सीमेवर बीएसएफ जवान सध्या अलर्ट मोडमध्ये आहेत. दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वादाच्या दरम्यान सीमावर्ती भागात सुरक्षेबाबत एक गंभीर किस्सा घडला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, काही बांगलादेशी तरुण भारतीय सीमेजवळील संवेदनशील भागांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाने त्यांना शूटिंग थांबवायला सांगितले तरीही त्यांनी ऐकण्यास नकार दिला. अखेर जवानाने त्यांनी बंदूक दाखवल्यावर ते पळून गेले.
व्हायरल व्हिडिओनुसार, काही तरुण भारत-बांगलादेश सीमेवरील संवेदनशील भागांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होते. बीएसएफ जवानाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि कडक शब्दांत इशारा दिला. तरीही तरुणांनी रेकॉर्डिंग थांबवण्यास नकार दिल्यावर, सैनिकाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गोळीबार करण्याची धमकी दिली.
बीएसएफ सैनिकाने दाखवली रायफल
बीएसएफ जवानाने तरुणांना वारंवार समजावून सांगितले, परंतु त्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. अखेर जवानाने त्याची रायफल बाहेर काढली आणि मॅग्झिन लोड केले. असा दावा केला जात आहे की बीएसएफ सैनिकाने गोळीबारही केला. पण हा व्हिडिओ कोणत्या भागातील आहे हे स्पष्ट नाही.
दरम्यान, सीमा सुरक्षा दलाने १८ डिसेंबरला मोठी कारवाई केली आणि भारत-बांगलादेश सीमेवरून दोन सोन्याच्या तस्करांना अटक केली. हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारने लोकसभेत सादर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान भारत-बांगलादेश सीमेवर सर्वाधिक १,१०० घुसखोरीचे प्रयत्न झाले, ज्यात २,५०० हून अधिक अटक करण्यात आल्या. याशिवाय, बांगलादेशच्या सीमेच्या ७९.०८ टक्के आणि पाकिस्तानच्या सीमेच्या ९३.२५ टक्के कुंपण घालण्यात आले आहे, असे सरकारने सांगितले.
Web Summary : A BSF jawan confronted Bangladeshi youths filming sensitive areas near the Indo-Bangladesh border. Despite warnings, they persisted until the jawan brandished his rifle. India-Bangladesh border saw 1,100 infiltration attempts this year.
Web Summary : बीएसएफ जवान ने भारत-बांग्लादेश सीमा के पास संवेदनशील क्षेत्रों की वीडियोग्राफी कर रहे बांग्लादेशी युवकों का सामना किया। चेतावनी के बावजूद, वे नहीं माने तो जवान ने राइफल निकाल ली। इस वर्ष सीमा पर घुसपैठ के 1,100 प्रयास हुए।