अहो आश्चर्यम! बाईकवरून जाणाऱ्या कुटुंबावरून ट्रॅक्टर गेला अन् चमत्कार घडला, VIDEO व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:00 IST2021-11-06T14:55:24+5:302021-11-06T15:00:04+5:30
संपूर्ण कुटुंबाच्या अंगावरून गेला ट्रॅक्टर; कोणलाही गंभीर दुखापत नाही

अहो आश्चर्यम! बाईकवरून जाणाऱ्या कुटुंबावरून ट्रॅक्टर गेला अन् चमत्कार घडला, VIDEO व्हायरल
जयपूर: देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात. राजस्थानमधील झुंझनू जिल्ह्यात याची प्रचिती देणारी घटना घडली आहे. नवलगढमधील खिरोड परिसरात घडलेल्या चमत्काराची सध्या पंचक्रोशीत चर्चा आहे. एका कुटुंबावरून ट्रॅक्टर जाऊनही त्यातल्या कोणालाही सुदैवानं मोठी इजा झाली नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
एक दाम्पत्य त्यांच्या दोन मुलांसह दुचाकीवरून चाललं होतं. रस्त्यावर गतिरोधक होता. मात्र तो बहुधा दुचाकीस्वाराला दिसला नाही. त्यामुळे त्याचा तोल गेला आणि दुचाकीसह चार जण खाली पडले. तितक्यात त्यांच्या मागून ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर चौघांच्या अंगावरून गेला. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. तर इतर तिघांना फार गंभीर दुखापत झालेली नाही. सकाळी साडे अकराच्या सुमारास जुन्या मशिदीजवळ ही घटना घडली. दैव बलवत्तर असल्यानं चौघांचा जीव वाचला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.