VIDEO : दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचवला त्याने जीव, सोशल मीडियात बनला हिरो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 15:49 IST2019-06-28T15:48:55+5:302019-06-28T15:49:33+5:30
लहान मुलं कधी कुठे जातील याचा काही नेम नाही. कधी कधी तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की, ते अडचणीत सापडतात.

VIDEO : दुसऱ्या मजल्यावरून पडलेल्या मुलीचा वाचवला त्याने जीव, सोशल मीडियात बनला हिरो!
लहान मुलं कधी कुठे जातील याचा काही नेम नाही. कधी कधी तर त्यांच्यावर लक्ष ठेवणं कठीण होऊन बसतं आणि कधी कधी असं होतं की, ते अडचणीत सापडतात. तुर्कीतील इस्तांबुलमध्ये असंच काहीसं झालं. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एक चिमुकली पडली तेव्हा तिची किचनमध्ये काम करत होती. सुदैवाने खाली रस्त्यावर उभ्या असलेल्या तरूणाने तिचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे. ही घटना आहे २० जूनची सांगितली जात आहे. या स्पष्ट दिसत आहे की, दोन तरूण रस्त्याच्या कडेला उभे आहेत. दरम्यान एका तरूणाने पाहिले की, शेजारच्या इमारतीवर एक मुलगी लटकलेली आहे. अशात त्याने चपळता दाखवत तिला खाली पडण्यापासून बचावले. ती पडली खरी पण त्यांने तिला लगेच पकडले आणि मुलीचा जीव वाचला.
'डेली सबा' च्या एका रिपोर्टनुसार, या मुलीचं वय २ वर्षे सांगितलं जात आहे. ही घटना घडली तेव्हा तिची आई किचनमध्ये कामात होती. तर ही मुलगी खिडकीला लटकत होती आणि अचानक पडली. वेळीच तरूणाने तिला पकडलं. हा तरूण त्याच गल्लीतील एका दुकानात काम करतो. या घटनेचा धक्कादायक क्षण समोरच्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. ज्या तरूणाने या मुलीचा जीव वाचवला त्याचं सोशल मीडियाच यूजरकडून कौतुक केलं जात आहे.