विषय खोल! अक्षयचा पत्ता कट करून शिल्पा शेट्टीसोबत स्वत:ची सेटिंग, व्हिडीओवर लोकांच्या उड्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 13:18 IST2020-02-17T13:18:48+5:302020-02-17T13:18:55+5:30

जेव्हापासून लोकांच्या जीवनात टिकटॉक आलंय तेव्हा लोकांचं जीवनच बदलून गेलंय. म्हणजे काही अशक्य राहिलं नाही अशी स्थिती झाली आहे.

Tiktok user create chura ke dil mera goriya chali without Akshay Kumar watch viral video | विषय खोल! अक्षयचा पत्ता कट करून शिल्पा शेट्टीसोबत स्वत:ची सेटिंग, व्हिडीओवर लोकांच्या उड्या!

विषय खोल! अक्षयचा पत्ता कट करून शिल्पा शेट्टीसोबत स्वत:ची सेटिंग, व्हिडीओवर लोकांच्या उड्या!

जेव्हापासून लोकांच्या जीवनात टिकटॉक आलंय तेव्हा लोकांचं जीवनच बदलून गेलंय. म्हणजे काही अशक्य राहिलं नाही अशी स्थिती झाली आहे. याचंच उदाहरण असलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 'तू खिलाडी मैं अनाडी' नावाच्या सिनेमातील शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमारचं फारच लोकप्रिय गाणं आहे 'चुरा के दिल मेरा...'. एका टिकटॉक यूजरने या गाण्यातून चक्क अक्षय कुमारला गायब केलं आणि स्वत:ला त्या जागी ठेवलं. 

हा व्हिडीओ @arkhmet नावाच्या यूजरने शेअर केलाय. त्याने लिहिलं की, हा आतापर्यंत सर्वात बेस्ट टिकटॉक व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ १ लाख २९ हजारांपेक्षा लोकांनी पाहिला असून ८ हजारपेक्षा जास्त लाइक्स आणि २ हजारांपेक्षा जास्त रिट्विट मिळाले आहेत.

@xhekkhar

Churake Dil mera🙈 theshilpashetty ma'am, Trying my old Style for this #throwback Gold Song🤩 #VFXIndia#fyp#tiktok#tiktokindia#tbt

♬ original sound - theshilpashetty

टिकटॉकवर दररोज नवनवीन व्हिडीओ अपलोड होत असतात. तेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण या व्हिडीओची बातच वेगळी असल्याचं लोक म्हणत आहेत.

 


Web Title: Tiktok user create chura ke dil mera goriya chali without Akshay Kumar watch viral video