VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 17:16 IST2021-06-24T17:13:37+5:302021-06-24T17:16:09+5:30

तो जंगलात जाताच संपूर्ण जंगलाला आपल्या डराकाळीने दाखवतो की, जंगलाचा राजा आता परत आला आहे. आपल्या स्वतंत्र दुनियेत.

Tiger released in jungle video will show you how freedom looks like | VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात!

VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात!

स्वातंत्र्य ही अशी गोष्टी जी फक्त फील केली जाऊ शकते. याबाबत तिच व्यक्ती सांगू शकते जी कैदेत असते. वाघाचा एक व्हिडीओ आयएएफ अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. यात वाघ पिंजऱ्यात कैद आहे, पण जसं त्याला सोडलं जातं तो वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतो. तो जंगलात जाताच संपूर्ण जंगलाला आपल्या डराकाळीने दाखवतो की, जंगलाचा राजा आता परत आला आहे. आपल्या स्वतंत्र दुनियेत.

हा व्हिडीओ बिहारच्या वाल्मीकी टायगर रिझर्वमधील आहे. ट्विटनुसार या वाघाला रेस्क्यू ऑपरेशननंतर जंगलात सोडण्यात आलं. परवीन कासवानने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, स्वातंत्र्य कसं वाटतं. (हे पण बघा : Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..)

या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, वाघाचा पिंजरा पूर्णपणे उघडलाही नव्हता की, तो वेगाने जंगलाकडे धावत जातो तो जंगलात जाताच डरकाळी फोडतो आणि एक लांब उडी मारतो.
 

Web Title: Tiger released in jungle video will show you how freedom looks like