शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Tiger Monkey Video: शिकारीसाठी झाडावर चढलेला वाघ माकडावर झडप घालणार इतक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:34 IST

वाघ चक्क झाडाच्या टोकापर्यंत वर जातो, पण पुढे काही वेगळंच घडतं.

Tiger Monkey Video: वाघ हा जंगलातील असा प्राणी आहे की ज्याच्या सामर्थ्यासमोर जंगलातील इतर बरेचसे प्राणी कमकुवत वाटतात. जंगलात वाघ दिसला की प्राणी आपला जीव वाचवून पळ काढतात. शिकार करण्यात वाघ अतिशय तरबेज प्राणी मानला जातो. असे असले तरी वाघ प्रत्येक वेळेस यशस्वी होईलच असे नाही. कधीकधी त्यालाही निराश व्हावे लागते. कारण काही प्राणी ताकदीने नव्हे तर युक्तीने बाजी पलटवतात. व्हायरल झालेला एक व्हिडिओ हा त्याचाच एक पुरावा आहे, असं नक्की म्हणता येईल.

नक्की काय घडलं?

जंगलातला हा व्हिडीओ खूपच मस्त आहे. असे घडते की यामध्ये वाघ झाडावर चढताना दिसतो. माकड झाडावर अगदी आरामात बसलेले असते. त्याला वाघ जवळ येत असल्याची कसलीही भीती नसल्याचे ते माकड दाखवते. पण वाघ जसा जवळ येतो तसे ते माकड आपला प्लॅन आमलात आणते आणि वाघाशी झुंजही न करता वाघाला जमिनीवर पाडते.

वाघ माकडाच्या जवळ पोहोचताच झाड हालत असते. वाघाच्या वजनाने झाडावर कोणीतरी येत आहे असे समजू शकते. वाघ जसाजसा पुढे येतो तसे पाहणाऱ्यांचीही धडधड वाढते. वाघ माकडावर झडप घालणार इतक्यात माकड लगेच एका झाडावरून दुसऱ्या फांदीवर निघून जाते. वजनदार वाघाचा मात्र तोल जातो. वाघ तिथेच झुडपात लटकत राहतो आणि स्वत:च्याच वजनाने खाली पडतो. अवघ्या २ मिनिटे १२ सेकंदाच्या या व्हिडीओने चांगलीच वाहवा मिळवली आहे. पाहा हा भन्नाट व्हिडीओ-

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसतोय.

 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTigerवाघMonkeyमाकडwildlifeवन्यजीव