चोर चोरी करून गेला पण लोकांची मनं जिंकून गेला...या चोरावर होतोय प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:07 IST2021-07-09T12:06:39+5:302021-07-09T12:07:20+5:30

जगात अनेक प्रकारची लोक असतात. कोणी मेहनतर करून पैसे कमवतात तर कुणी चोरी करतात. चोरी करणे हा गुन्हा आहे त्यामुळे लोक त्या व्यक्तीकडे तिरस्कारानेच बघतात. पण सध्या इंटरनेटवर असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या चोरावर चक्क लोक प्रेमाचा वर्षाव करतायत.

The thief stole but won the hearts of the people | चोर चोरी करून गेला पण लोकांची मनं जिंकून गेला...या चोरावर होतोय प्रेमाचा वर्षाव

चोर चोरी करून गेला पण लोकांची मनं जिंकून गेला...या चोरावर होतोय प्रेमाचा वर्षाव

जगात अनेक प्रकारची लोक असतात. कोणी मेहनतर करून पैसे कमवतात तर कुणी चोरी करतात. चोरी करणे हा गुन्हा आहे त्यामुळे लोक त्या व्यक्तीकडे तिरस्कारानेच बघतात. पण सध्या इंटरनेटवर असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या चोरावर चक्क लोक प्रेमाचा वर्षाव करतायत. अवाक् झालात ना?


या चोराची कथाच तशीय. हा चोर एटीएममध्ये चोरी करायला गेला. त्या आधी त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघितले आणि चिडवून दाखवले. त्यानंतर या चोराने एटीएम खोलले. एटीएममधुन पैसे काढले आणि पसार झाला. मात्र त्याने पैसे काढताना एक विशेष गोष्ट केली. त्याने जितके गरजेचे आहेत तितकेच पैसे काढले आणि तो तिथून गेला. त्याच्या या गोष्टीकडे बघुन लोक भावूक झाले आहेत. अनेकजण त्यावर दया व्यक्त करत आहेत. या व्हिडिओखाली 'इन्सानियत अभी भी जिंदा है, अशी कॅप्शन लिहिली होती'. त्याखाली लोकांनी तो चोर सगळे पैसे घेऊ शकला असता पण त्याने फक्त गरजेपुरतेच पैसे घेतले अशा कमेंट्स केल्या आहेत. या चोराचा नंतर मृत्यू झाला.

Web Title: The thief stole but won the hearts of the people