गांजा घेऊन जाणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात, पण लोक त्यांच्या विचित्र फोटोंवरच थबकले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 16:27 IST2019-10-11T16:26:45+5:302019-10-11T16:27:29+5:30
आतापर्यंत त्यांचे फोटो ६ हजार पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहेत.

गांजा घेऊन जाणारे तिघे पोलिसांच्या जाळ्यात, पण लोक त्यांच्या विचित्र फोटोंवरच थबकले!
हा फोटो अमेरिकेतील रिकी डीलेचा आहे. त्याला कोकेन, हॅंडगन आणि गांजासहीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्यासोबत Logan tindale आणि Katlyn Spruill यांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर या तिघांचेही फोटो पोलिसांनी माहितीसाठी फेसबुकवर टाकले. आता यांच्या गुन्हा राहिला बाजूला आणि लोक त्यांच्या फोटोंचीच चर्चा करू लागले आहेत. आतापर्यंत त्यांचे फोटो ६ हजार पेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहेत.
Marion County Sheriff's Office च्या फेसबुक पेजवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे. घटना १० ऑक्टोबरची आहे. पोलिसांनी या तिघांच्या कारचा पाठलाग केला. त्यावेळी त्यांच्या गाडीत एक हॅंडगन, गांजा, कोकेन आणि इतरही मादक नशेचे पदार्थ आढळून आले. सध्या या तिघांची रवाणगी पोलिसांनी तुरूंगात केली आहे.
मुळात लोकांना तिघांच्या फोटोत काहीतरी विचित्र किंवा वेगळं वाटत आहे. त्यामुळे लोक भरभरून कमेंट करत आहेत. त्यांची खिल्ली उडवतानाही दिसत आहे. आतापर्यंत त्यांच्या फोटोंवर ८५०० कमेंट्स आल्या आहेत आणि ६ हजारपेक्षा अधिक लोकांनी शेअर केले आहेत.