शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 12:21 IST

अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

सोशल मीडियाच्या जगात कोणतीच गोष्ट लपून राहू शकत नाही. कोणी एकाने व्हिडीओ अथवा फोटो कैद केल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून तो जगभर पोहोचत असतो. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, यातील चोरी पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल. मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये आग्रा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर बाईकवर स्वार झालेले तीन चोरटे एका चालत्या ट्रकमधून सामान चोरताना दिसत आहेत. मात्र, विशेष बाब म्हणजे या चोरीच्या घटनेत ट्रक चालकाचा देखील हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

ट्रक संथ गतीने पुढे जात असताना चोरट्यांनी मालाची चोरी सुरू ठेवली. चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर ट्रक चालकाने आपल्या वाहनाची बाजू बदलून तो पुढे निघून गेला. ही घटना आता चर्चेचा विषय बनली आहे. ही चोरी ट्रक चालकाच्या संमतीने झाली का, असा प्रश्न लोकांना पडत आहे. ट्रक चालक चोरांचा साथीदार आहे का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

... म्हणून ट्रक चालकावर संशयसंबंधित ट्रकला आरसे असताना देखील चालकाला काहीच कसे कळले नाही असा प्रश्न नेटकरी करत आहेत. तर, ट्रक चालकाने चोरट्यांना सहकार्य करत चोरी करण्यासाठी मदत केली असल्याचेही काहींनी म्हटले आहे. चोरी पूर्ण होईपर्यंत आणि तिघेही चोरटे खाली उतरेपर्यंत ट्रक एकदम कडेच्या लेनने जात होता. पण, चोरीची घटना पूर्ण झाल्यानंतर चालकाने लेन बदलल्याने संशय बळावला आहे. या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण केला जात आहे.  

तसेच तीन चोरट्यांनी चालत्या ट्रकमध्ये चोरी केल्याने अनेकांना धक्का बसला. चालू ट्रकमध्ये धाडस दाखवत ते चोरटे खाली उतरले. त्यांचा एक साथीदार मागून एका मोटारसायकलवर येत असल्याचे दिसते. विशेष बाब म्हणजे चोरट्यांनी आपले काम पूर्ण झाल्यानंतर चालू गाडीतून खाली उतरण्याची भलतीच किमया साधली. खरे तरे ते चोरटे ट्रकमधून उतरले आणि धावत्या मोटारसायकलवर स्वार झाले. या अनोख्या चोरीच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलtheftचोरीSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारी