शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पासपोर्ट नूतनीकरणासाठी पाठवला, उघडताच मजकूर वाचून अधिकाऱ्यांना धक्का बसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 16:56 IST

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक पासपोर्ट आहे जो पासपोर्ट अधिकाऱ्यांकडे नूतनीकरणासाठी आला आहे, यामध्ये लिहिलेला मजकूर वाचून अधिकारीही अवाक झाले आहेत.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या एक पासपोर्ट व्हायरल झाला आहे, हा पासपोर्ट नूतनीकरणासाठी आला होता, त्यातील मजकूर पाहून अनेकांना धक्का बसला आहे. 

समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीचा पासपोर्ट आहे. कोणीतरी नूतनीकरणासाठी कार्यालयात पाठवले आहे पण ते उघडून पाहिले असता विविध देशांच्या व्हिसाच्या शिक्क्यांऐवजी दुसरेच काहीतरी दिसते. त्यावर जगभरातील फोन नंबर लिहिलेले आहेत. जेव्हा ऑफिसमधील लोकांनी हे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ बनवला. 

Video - हृदयस्पर्शी! 8 वर्षांच्या मुलाला शाळेत पोहोचताच मिळालं वाढदिवसाचं जबरदस्त सरप्राईज

आता काही केल्या त्याला नवीन पासपोर्ट बनवावा लागेल.@DPrasanthNair नावाच्या ट्विटर युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे आणि कॅप्शन लिहिले आहे - 'एका वृद्ध गृहस्थाने नूतनीकरणासाठी पासपोर्ट जमा केला. पण या पासपोर्टचे त्याच्या कुटुंबातील कोणी काय केले, याचीही त्याला माहिती नाही. हे पाहिल्यानंतरही अधिकारी धक्क्यातून सावरलेले नाहीत. पासपोर्टमध्ये सर्व काही मल्याळममध्ये आहे पण ते समजण्यासारखे आहे.

पासपोर्टचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरने लिहिले- अशी कल्पना करा की तुम्ही परदेशात प्रवास करणार आहात. सर्व तयारी पूर्ण झाली आणि इमिग्रेशन अधिकाऱ्याने त्यावर शिक्का मारण्यासाठी ते उघडले आणि हे सर्व पाहिले तर काय होईल? दुसर्‍याने लिहिले - या व्यक्तीला प्रवासाची संधी कधीच मिळाली नाही, त्यामुळे पाने का रिकामी ठेवायची, त्यावर फक्त खाती आणि फोन नंबर लिहावेत, असा विचार त्याच्या कुटुंबीयांनी केला असेल. पासपोर्टचा गैरवापर हा गुन्हा असल्याचेही काही लोकांनी सांगितले. 

काही वर्षांपूर्वी महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी अशीच एक घटना शेअर केली होती, यामध्ये एका मुलाने वडिलांच्या पासपोर्टवर बरीच रेखाचित्रे काढली होती. पासपोर्ट हा सरकारद्वारे जारी केलेला एक दस्तऐवज आहे जो एखाद्या व्यक्तीची ओळख आणि राष्ट्रीयत्व पुष्टी करतो आणि त्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याची परवानगी देतो. भारतात, परराष्ट्र मंत्रालय भारतीय नागरिकांना पासपोर्ट जारी करते. हा भारतीय नागरिकत्वाचा पुरावा आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल