शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

टांझानियाच्या या तरुणाची भारतीयांवर जादू आता म्हणतोय, तेरे संग यारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2021 18:51 IST

टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. याच मालिकेत आणखी भर घालत भावाने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रुस्तम’ (Rustum) या चित्रपटातील तेरे संग यारा.. (Tere sang Yara) गाण्यावर लिपसिंक करून सोशल मीडियावर (Social media) धमाल उडवली आहे.

टांझानियातले भाऊ-बहीण सध्या बॉलिवूड चित्रपटांमधील प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून इंटरनेट सेंसेशन बनले आहेत. याच मालिकेत आणखी भर घालत भावाने अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘रुस्तम’ (Rustum) या चित्रपटातील तेरे संग यारा.. (Tere sang Yara) गाण्यावर लिपसिंक करून सोशल मीडियावर (Social media) धमाल उडवली आहे. पाहता पाहता हा व्हिडिओ असंख्य लोकांनी पसंत केलाय. या भावंडांच्या जोडीने सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या ‘शेरशाह’ गाण्यातील ‘राता लंबिया’ गाण्यावर लिपसिंक केले होते. त्यानंतर इंटरनेटवर त्यांच्या चाहत्यांची लाटच उसळली आहे.

किली पॉल आणि नीमा नावाचे हे आफ्रिकी भाऊ-बहीण आहेत. सोशल मीडियाचे यूझर्स सध्या त्यांच्या तुफ्फान प्रेमात पडलेत. kili_paul नावाने त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्यावर ते बॉलिवूड चित्रपटातील गाण्यांवर लिपसिंक आणि डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर करत असता. नुकतेच त्यातील भावाचे एक गाणे खूप व्हायरल होत आहे. अक्षय कुमारच्या ‘रुस्तम’ चित्रपटातील ‘तेरे संग यारा..’ वर लिपसिंक करत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला. चला पाहुयात…

या आफ्रिकी भावंडांची लोकप्रियता एवढ्या वेगाने वाढत आहे की, व्हिडिओ शेअर केल्यानंतर केवळ १३ तासातच ३१ हजारपेक्षा जास्त यूझर्सनी त्याला लाइक केले. किली आणि नीमा बॉलीवूडच्या गाण्यांवर लिपसिंक करत भारतात लोकप्रिय होत आहेत. भारतीय सोशल मीडिया यूझर्स या जोडीच्या प्रेमात पडले आहेत. नवा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

एका यूझरने कमेंटमध्ये लिहिले, ‘तुम्ही खूप छान काम करत आहात. मला खरोखरच तुमचे व्हिडिओ पहायला आवडतात’. एका महिला यूझरने लिहिले, ‘व्हिडिओच्या शेवटी तुमचे हसणे… हाए…’ एकाने प्रश्न विचारलाय, तुमच्या फोनच्या कॅमेऱ्याची क्वालिटी खूपच छान आहे. कोणता स्मार्टफोन वापरता?

यापूर्वी या भावंडांनी अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या ‘टिप टिप बरसा पानी’ वर डान्स आणि लिपसिंक केले होते. त्या गाण्यातील जबरदस्त डान्स मूव्ह कतरिनाने पाहिल्या असत्या तर तिनेही यांचे खूप कौतुक केले असते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामcinemaसिनेमा