Video : जेव्हा जेव्हा शहरावर होतो बॉम्ब हल्ला तेव्हा चिमुरडीला हसवतो बाबा, कारण वाचून व्हाल भावुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:45 PM2020-02-18T13:45:36+5:302020-02-18T14:22:10+5:30

Syria : एकीकडे बॉम्ब हल्ला सुरू असतो तर दुसरीकडे लोक अशा स्थितीतही आपलं सामान्य जीवन जगत आहेत. दरम्यान एक पिता बॉम्ब हल्ला होत असताना त्याच्या ४ वर्षीय मुलीला हसवतो.

Syria Viral Video : Father teaches daughter to laugh every time bomb drops so she doesnt get scared | Video : जेव्हा जेव्हा शहरावर होतो बॉम्ब हल्ला तेव्हा चिमुरडीला हसवतो बाबा, कारण वाचून व्हाल भावुक!

Video : जेव्हा जेव्हा शहरावर होतो बॉम्ब हल्ला तेव्हा चिमुरडीला हसवतो बाबा, कारण वाचून व्हाल भावुक!

Next

काही दिवसांपूर्वीच सीरियातील इदलिबमध्ये बॉम्ब टाकण्यात आले होते. हे ठिकाण नॉर्थ-वेस्ट सीरियामध्ये टर्किश बॉर्डरजवळ आहे. रिपोर्टनुसार, सीरियातील वायु सेना आणि रशियाच्या मदतीने केलेल्या हल्लाचं उत्तर म्हणून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात इदलिबमध्ये आतापर्यंत २१ लोक मारले गेले आहेत. या स्थितीतही तिथे अनेक परिवार आपलं जीवन जगत आहेत.

एकीकडे बॉम्ब हल्ला सुरू असतो तर दुसरीकडे लोक अशा स्थितीतही आपलं सामान्य जीवन जगत आहेत. दरम्यान एक पिता बॉम्ब हल्ला होत असताना त्याच्या ४ वर्षीय मुलीला हसवतो. याचं कारण वाचून तुम्ही या मुलीच्या वडिलाला सलाम कराल. सोशल मीडियात या असाच एक बाप-लेकीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ Ali Mustafa नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 'किती दु:खं आहे जगात, आपल्या चार वर्षांच्या मुलीसाठी तिच्या वडिलांनी एक खेळ तयार केलाय. जेव्हा इदलिबवर बॉम्ब टाकले जातात तेव्हा दोघेही जोरजोरात हसतात. जेणेकरून मुलीला बॉम्ब फुटल्यावर होणाऱ्या आवाजाने भीती वाटू नये.

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून आतापर्यंत १० लाख लोकांनी पाहिलाय. तर ६ हजारांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत. इतकेच नाही तर या व्हिडीओवर ३ हजारपेक्षा जास्त कमेंट आल्या आहेत. अनेकांनी हे फारच वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

 


Web Title: Syria Viral Video : Father teaches daughter to laugh every time bomb drops so she doesnt get scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.