स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, छतावर उडी मारताना खाली पडला तरूण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:00 IST2022-03-21T12:59:52+5:302022-03-21T13:00:12+5:30
सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) होतात, ज्यामध्ये लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, पण कधी-कधी त्यांचेच स्टंट त्यांच्या अंगाशी येतात.

स्टंटबाजी करणं आलं अंगाशी, छतावर उडी मारताना खाली पडला तरूण
तुम्हाला चित्रपटातील स्टंट मजेदार वाटत असतील, पण चित्रपटांमधील स्टंटमध्ये सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. मात्र, जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना स्टंट करायला खूप आवडते. सोशल मीडियावर तुम्ही एकापेक्षा एक स्टंट व्हिडिओ पाहिले असतील. सध्या तरुणांमध्ये याची क्रेझ खूप वाढली आहे. सोशल मीडियावर अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल (Viral Videos) होतात, ज्यामध्ये लोक धोकादायक स्टंट करताना दिसतात, पण कधी-कधी त्यांचेच स्टंट त्यांच्या अंगाशी येतात.
असाच एक धोकादायक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरूण छतावर उडी मारताना दिसत आहे. तो वेगाने उडी मारताना दिसतो पण अचानक त्याचा तोल जातो आणि खाली पडतो. अचानक तोल गेल्यामुळे पडल्याने त्याला दुखापत झाली. मात्र, या घटनेवेळी त्याचे नशीब चांगले होते, कारण तो छताच्या कोपऱ्यावर पडला नाही, अन्यथा तो गंभीर जखमी झाला असता. त्यामुळेच कोणताही स्टंट करताना खूप काळजी घ्यावी लागते, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, असे म्हटले जाते.
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक त्या तरूणावर कमेंट करत आहेत. आतापर्यंत 12 मिलियन म्हणजेच 1.2 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 1 लाख 49 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाइकही केले आहे. एका युजरने या व्हिडिओला कंमेंट करताना म्हटले आहे की, जेव्हा तुम्ही खूप मॅट्रिक्स (चित्रपट) पाहता तेव्हा असे होते. दरम्यान, अशा अनेक लोकांच्या कमेंट्स सोशल मीडियावर येत आहेत.