आय लव्ह यू मॅम...विद्यार्थ्याने 'प्रिय शिक्षक' विषयावर लिहिला निबंध, मॅमने पोस्ट केली उत्तर पत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 12:25 PM2024-04-10T12:25:32+5:302024-04-10T12:26:22+5:30

निबंध लिहिण्यासाठी मुलाने 'प्रिय शिक्षक' विषय निवडला आणि आपली आवडती शिक्षिका भूमिकाबाबत त्याने त्याचे विचार लिहिले.

Student essay on favorite teacher goes viral on social media | आय लव्ह यू मॅम...विद्यार्थ्याने 'प्रिय शिक्षक' विषयावर लिहिला निबंध, मॅमने पोस्ट केली उत्तर पत्रिका

आय लव्ह यू मॅम...विद्यार्थ्याने 'प्रिय शिक्षक' विषयावर लिहिला निबंध, मॅमने पोस्ट केली उत्तर पत्रिका

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. रील्स-व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले जातात. सोशल मीडियावर कधी हैराण करणारे तर कधी चेहऱ्यावर हसू आणणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. पोस्टही व्हायरल होत असतात. अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ही एका लेटरची पोस्ट आहे. 

अशीच एक व्हायरल पोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. एक्सवर ही पोस्ट व्हायरल झाली आहे. एका एक्स यूजरने तिच्या सहाव्या वर्गातील विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका पोस्ट केली आहे. ज्यात त्याने त्याच्या प्रिय शिक्षिकेवर निबंध लिहिला आहे. त्याने यात जे लिहिलं आहे ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल. 

निबंध लिहिण्यासाठी मुलाने 'प्रिय शिक्षक' विषय निवडला आणि आपली आवडती शिक्षिका भूमिकाबाबत त्याने त्याचे विचार लिहिले. त्याने निबंधाच्या सुरूवातीला लिहिलं की, तसे तर आम्हाला सगळे शिक्षक आवडतात. पण सगळ्यात जास्त प्रिय भूमिका मॅम आहेत ज्या आम्हाला खूप चांगल्या गोष्टी शिकवतात. आमच्यावर खूप प्रेम करतात. त्याने शेवटी लिहिलं की, देवाच्या कृपेने आमचे सगळे शिक्षक भूमिका मॅमसारखे असावते. तेव्हा सगळे चांगला अभ्यास करतील. सोबतच त्याने आय लव्ह यू भूमि मॅम असंही लिहिलं.

X यूजर @Rajputbhumi157 या निबंधाचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिलं की, सहाव्या वर्गातील विद्यार्थी. जेव्हाही मूड चांगला करायचा असतो तेव्हा हे वाचत असते. या पोस्टला हजारो व्ह्यूज मिळत आहेत आणि लोकही यावर भरभरून कमेंट्स करत आहेत. 

Web Title: Student essay on favorite teacher goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.