Pitbull vs Street Dog Viral Video: प्राण्यांच्या जगात जगण्यासाठी केवळ ताकदच नाही, तर बुद्धीचीही गरज असते, याचा प्रत्यय देणारा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. एका हिंसक पिटबुल (Pitbull) कुत्र्याने हल्ला केल्यानंतर, एका रस्त्यावरच्या कुत्र्याने चक्क 'मेल्याचं सोंग' (Playing Dead) घेऊन स्वतःचा जीव वाचवला. या कुत्र्याची ही भन्नाट आयडिया पाहून प्राणिशास्त्रज्ञ आणि नेटकरीही थक्क झाले.
नेमकं काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक तगडा पिटबुल कुत्रा रस्त्यावरील एका कुत्र्यावर हल्ला करतो. पिटबुलची ताकद आणि त्याचा आक्रमक स्वभाव पाहता, रस्त्यावरच्या कुत्र्याला इजा होण्याची दाट शक्यता होती. पण पिटबुलने त्याला जबड्यात पकडताच, त्या कुत्र्याने प्रतिकार करणे पूर्णपणे थांबवून टाकले आणि त्याने मेल्याचे नाटक केले. कसलीही हालचाल न केल्यामुळे पिटबुलला वाटले की तो कुत्रा मेला. हालचाल दिसत नसल्यामुळे पिटबुलचा आक्रमकपणा कमी झाला आणि त्याने आपली पकड सैल केली. काही वेळाने जेव्हा लोक पिटबुलला तिथून दूर नेण्यात यशस्वी झाले, तेव्हा सर्वांना वाटले की दुसऱ्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, पिटबुल नजरेआड होताच, तो 'मृत' वाटणारा कुत्रा अचानक उठला आणि वेगाने तिथून पळून गेला.
सोशल मीडियावर चर्चेचा विषय
या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी याला 'नॅचरल इंटेलिजन्स' म्हटले आहे. संकटाच्या वेळी घाबरून न जाता शांत राहून परिस्थिती हाताळणे किती महत्त्वाचे आहे, याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे युजर्स सांगत आहेत. प्राण्यांच्या भाषेत याला 'थॅनाटोसिस' (Thanatosis) किंवा 'ॲडॅप्टिव्ह बिहेविअर' असे म्हणतात, ज्यात प्राणी शिकारीपासून वाचण्यासाठी मृत असल्याचे नाटक करतात.
Web Summary : A street dog survived a pitbull attack by cleverly playing dead. The pitbull, fooled by the lack of movement, loosened its grip. Once the pitbull was gone, the dog quickly escaped, impressing viewers with its survival tactic.
Web Summary : एक सड़क के कुत्ते ने मरने का नाटक करके पिटबुल के हमले से खुद को बचाया। कुत्ते की चतुराई देखकर लोग दंग रह गए। पिटबुल को लगा कुत्ता मर गया और उसने पकड़ ढीली कर दी। मौका मिलते ही कुत्ता भाग गया।